शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणाची सात दिवस मृत्युशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ऊन व थंडी झेलत जखमी अवस्थेत तो अन्नपाण्याशिवाय सात दिवस पाण्यात निपचित पडला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : ऊन व थंडी झेलत जखमी अवस्थेत तो अन्नपाण्याशिवाय सात दिवस पाण्यात निपचित पडला होता. त्याला हालता येत नव्हते. जखमांवर किडे, मुंग्या फिरत होत्या. ज्याठिकाणी तो पडला होता, तेथून कालव्याचे पाणी जात होते. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने त्याच्या अंगाखालून पाणी चालले होते. प्रवाह जास्त असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता, पण त्याच्या आयुष्याची दोरीच बळकट होती.

अमेणी पैकी खोंगेवाडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील रुपेश विष्णू कदम (वय २६) हा ३० जानेवारी रोजी कोकरूड (ता. शिराळा) येथे मामांच्या घरी आला होता. त्याच रात्री तो गावी परतला. मात्र, घरी पोहोचला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली. त्यानंतर रुपेशचा सर्वत्र शोध सुरू झाला. तो सापडला नसल्याने त्याच्या वडिलांनी रुपेश बेपत्ता असल्याची फिर्याद १ फेब्रुवारी रोजी कोकरूड पोलीस ठाण्यात दिली.

शनिवारी (दि. ६) सकाळी तुरुकवाडी येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे शेतीला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शाहीरवाडी येथील सनंदरा शेताजवळ कोकरूड ते तुरुकवाडी रस्त्यालगत दहा ते पंधरा फूट ओघळात अर्धवट बेशुद्ध अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण आढळला. शेजारी दुचाकीही होती.

दरम्यान, तरुण बेपत्ता असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्वत्र फिरत होती. त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील, एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून त्याला भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात जाऊन त्याच्या नातेवाईकांनी तो रुपेश असल्याची खात्री करुन घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार एस. एल. मोरे हे करत आहेत.

फोटो-०६रुपेश कदम