विनायकनगरमध्ये तरुणास मारहाण
सांगली : शहरातील विनायकनगर येथे तरुणास दोघांनी मारहाण केली. प्रशांत सदाशिव शिकलगार (वय ३२) असे जखमीचे नाव आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---------------------------------------
शामरावनगरला एकास मारहाण
सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात तरुणास चौघांनी काठीने मारहाण केली. यात शंकर शिकलगार (वय २८) हा तरुण जखमी झाला. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
------------------------
समतानगरमध्ये तरुणास मारहाण
सांगली : समतानगर (मिरज) येथे तिघांनी तरुणास मारहाण केली. यात राहुल रायाप्पा पुजारी (वय २६) हा जखमी झाला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.