शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बागणीचा युवक उखळू धबधब्यात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:07 IST

बागणीचा युवक उखळू धबधब्यात वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : शाहुवाडी तालुक्यातील उखळू धबधबा (म्हातारकडा) पाहण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांपैकी एकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर (वय ३५, रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर, मेहबूब बाबासाहेब फकीर, दिलीप सदाशिव नगारे, राजेंद्र बाबूराव शेळके, प्रदीप रघुनाथ माळी (सर्व रा. बागणी, ता. वाळवा) व अशोक माळी (साखर कारखान्याजवळ, सांगली) हे उखळू (ता. शाहूवाडी) येथील निसर्गरम्य धबधबा पाहायला दुचाकीवरून गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते उखळू येथे पोहोचले. त्यातील पाचजण पाण्याच्या प्रवाहात उतरले असताना, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर हा प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना बाकीचे पाच जणही वाहून जाऊ लागले. पण प्रसंगावधान राखून सर्वजण डोहात दगडांचा आधार घेऊन व झाडांच्या फांद्या पकडून बसले. खुदबुद्दीनला वाचविताना त्याचा भाऊ मेहबूब जखमी झाला. याची माहिती मिळताच उखळू येथील स्थानिक युवराज पाटील,भगवान अनुते, सुरेश कुलकर्णी, रमेश पाटील व सहकाऱ्यांनी परिश्रम करून सर्वांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. जखमींना तातडीने आपत्कालिन रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल आर. गाडे, धनाजी खराटे यांच्याबरोबर उखळूचे माजी सरपंच मारूती वडाम, शित्तूरचे पोलिस-पाटील दीपक भोसले यांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच शाहुवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हा दुर्गम परिसर असल्याने वाहतुकीची कोणतीही सुविधा नसल्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेता आलेला नाही. बुधवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली जाण्याची शक्यता आहे.