सांगली : काकडवाडी फाटा येथे घरफोडी करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सचिन धारासिंग पवार (वय २४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) असे त्याचे नाव आहे.
जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गुरुवारी गस्तीवर होते. यावेळी मिरजहून काकडावाडी फाटामार्गे तासगावला जात असताना एक जण खोक्याच्या आडोशाला लपून बसल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून कटावणी व स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप ढेरे, संदीप गुरव, अनिल कोळशकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.