शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अंकलगीतील तरुणाची खलाटी येेथे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

संख : अंकलगी (ता.जत) येथील युवकाने खलाटीतील वन विभागाच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली. भीमराव रामू चौगुले (वय २३, ...

संख : अंकलगी (ता.जत) येथील युवकाने खलाटीतील वन विभागाच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली. भीमराव रामू चौगुले (वय २३, रा.चौगुले वस्ती, अंकलगी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेची जत पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद आहे.

भीमराव रामू चौगुले हा सोन्याळ अंकलगी रस्त्यावरील चौगुले वस्ती येथे आई व वडिलांसोबत राहत होता. त्याचा मोटार रिवायंडिंगचा व्यवसाय होता. रविवारी सकाळी सात वाजता कुलाळवाडी (ता.जत) येथून मोटार रिवायंडिंगची मोटार घेऊन येतो, असे सांगून तो घरातील दोन हजार रुपये घेऊन निघून गेला होता. दुपारपर्यंत घरी आला नाही. तो न आल्यामुळे घराच्यांनी शोध घेतला. त्याचा फोन कालपासून स्विच ऑफ होता.

आज सकाळी खलाटी येथील वन विभागाच्या हद्दीत झाडाला अनोळखी व्यक्तीने गळफास घेतल्याचे काही नागरिकांना आढळून आले. याबाबत संतोष आकाराम नाईक यांनी फोनवरून जत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी मृतदेहाजवळ मोबाइल सापडला. मोबाइल बंद होता. मोबाइल सुरू करून एका नंबरला पोलिसांनी फोन केला; तेव्हा मृत तरुण भीमराव रामू चौगुले असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सोमवार सकाळी भीमराव चौगुले हा बेपत्ता असल्याची फिर्याद उमदी पोलीस ठाण्यात त्याच्या कुुटुंबीयांनी दिली होती. यावेळी त्याच्या आत्महत्येची माहिती कुटुंबीयांना समजली.

जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार काका रुपनूर करीत आहेत.