शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

योगदिनी जिल्ह्यात सर्वत्र ‘वर्षासन’

By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST

शिराळ्यात मुसळधार : तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, विटा येथे दिवसभर मुक्काम

सांगली : सांगली, मिरजेसह तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी याठिकाणी रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जागतिक योगदिनी जिल्ह्याच्या दुष्काळी भागासह सर्वत्र ‘वर्षासन’ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. जत तालुक्यात शिडकावा झाल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.लिंगनूर : मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, एरंडोली, मल्लेवाडी, शिपूर व बेळंकी परिसरात रविवारी सकाळपासून मान्सून पावसाने हजेरी लावली. परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. पेरणी केलेल्या मका, मूग या पिकांना मान्सूनची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. मागील आठवड्यात मान्सून फिरकला नसल्याने खरीप पिकांची पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोनी (ता. मिरज) परिसरामध्ये पावसाची दमदार सुरुवात झाली असून पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला आता सुरुवात होणार आहे. काही शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे, त्या पिकांनाही जीवदान मिळणार आहे. सोनीसह परिसरातील धुळगाव, पाटगाव, भोसे, करोली (एम) परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पेरणी खोळंबली होती. गेल्या दोन वर्षापासून अपुऱ्या पावसामुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नव्हते. पण यावर्षी पावसाने उशिरा का होईना, पण जोरदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. वाळवा तालुक्यात मुक्कामइस्लामपूर : शहरासह संपूर्ण वाळवा तालुक्यात मान्सूनच्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावली असून रविवारी दिवसभर संततधार सुरूच होती. त्यामुळे शेतकऱ्यांनीही सकाळपासून सोयाबीन, भुईमुगाची टोकणी, पेरणी करायला सुरुवात केली. रविवारी दिवसभर कधी मोठ्या, तर कधी मध्यम स्वरुपाच्या पावसाने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शहरात नव्याने झालेल्या रस्ते डांबरीकरणाच्या कामात पाण्याचा निचरा होण्याच्या शास्त्रीय पध्दतीचा वापर केला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहिले होते. आठवडा बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत इस्लामपुरात ७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बहे मंडलात सर्वाधिक ३८, तर कुरळप मंडलात केवळ २ मि.मी. पाऊस झाला. पेठ व रेठरेधरण परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. आष्टा (ता. वाळवा) परिसरात रविवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. विट्यासह परिसरात हजेरीविटा शहरासह तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस पडत होता. हा पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता. दिवसभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विटा शहरासह तालुक्यातील पारे, बामणी, चिंचणी, आळसंद, भाळवणी, ढवळेश्वर, खानापूर, गार्डी, घानवड, नागेवाडी, चिखलहोळ, देविखिंडी, लेंगरे, भूड, साळशिंगे परिसरात कमी-जास्त प्रमाणात दिवसभर पाऊस पडत होता. या पावसाने शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले होते.