शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

...तरीही अडतीचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच

By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST

शासननिर्णयाने संभ्रमावस्था : अडतदार खरेदीदारांच्या भूमिकेत जाण्याची चिन्हे

अंजर अथणीकर / सांगलीकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहारातील अडत रद्द करण्याच्या पणन मंडळाच्या निर्णयाने बाजार समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रथमदर्शनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने असला तरी, अडतीचा अप्रत्यक्ष भुर्दंड हा शेतकऱ्यालाच बसणार आहे. अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी, तेवढ्या रकमेचा फटका शेतीमालाच्या दराला बसणार असल्याने हा भार शेतकऱ्यालाच सोसावा लागेल.पणन मंडळाने शेतीमाल खरेदी-विक्रीतील अडत रद्द करुन शेतकऱ्यांनी आता थेट आपल्या मालाची विक्री करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे गेल्या ६० वर्षांपासून बाजार समितीमध्ये असणाऱ्या अडत्याची भूमिका आता बदलणार आहे. सांगलीतील लहान-मोठ्या ४२५ अडत व्यापाऱ्यांची शासन निर्णयाने संभ्रमावस्था झाली आहे. शेतकरी बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल आणतो, तेव्हा त्याला बाजारातील दरांची माहिती नसते. त्यामुळे तो आपला माल अडत्याकडे ठेवतो. अडत्या त्यासाठी आपल्या गोदामाचा वापर करू देतो. जेव्हा खुल्या बाजारात शेतीमालाचे लिलाव निघतात, तेव्हा अडत्या हा माल लिलावात ठेवतो. जेव्हा या मालाला मागणी होते, तेव्हा शेतकऱ्याला याची माहिती देऊन त्याच्या परवानगीने त्याची लिलावात विक्री करतो. यासाठी बाजार समितीकडे नोंदणी करणे, वजन करणे आदी प्रक्रिया अडत व्यापारी पार पाडत असतो. यासाठी त्याला तीन टक्के कमिशन मिळत असते. अर्थात हे कमिशन शेतकरी अडत व्यापाऱ्याला देतो. आता ही अडत पध्दत रद्द करुन शेतकऱ्यांनी हा माल खरेदीदारांकडे द्यावा, असा निर्णय झाला आहे.पणन मंडळाच्या या निर्णयाने अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. यापूर्वी खरेदीदार हा अडत्याचे कमिशन वजा करुन शेतीमाल खरेदी करीत असे. आता तो या कमिशनएवढी रक्कम कमी करुन मालाची खरेदी करेल. त्यामुळे शेतीमालाला जेवढी किंमत यापूर्वी मिळत होती, तेवढीच किंमत त्याला यापुढेही मिळणार आहे.