शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुरळप परिसरातील ऊस कर्नाटकात घालविण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 12:26 IST

कर्नाटकातील हालसिध्दनाथ कारखान्याच्या ऊस टोळ्या कुरळप (ता. वाळवा) परिसरात दाखल झाल्या असून, यावर्षी या कारखान्याने पहिली उचल ३000 रुपये जाहीर केल्याने अनेक शेतकºयांनी ऊस कर्नाटकात घालविण्याची तयारी केली आहे.

ठळक मुद्देपहिली उचल ३000 रुपये जाहीर कारखान्याच्या तांत्रिक अडचणीमुळे ऊस तोड विलंबाने वशी, लाडेगाव, कुरळप परिसरात ८ ते १0 ऊस टोळ्या ट्रॅक्टरसह उतरल्याझोनबंदी नसताना ऊस उत्पादक कुठेही ऊस घालू शकतो : रघुनाथदादा पाटील

 

कुरळप , दि.४ : कर्नाटकातील हालसिध्दनाथ कारखान्याच्या ऊस टोळ्या कुरळप (ता. वाळवा) परिसरात दाखल झाल्या असून, यावर्षी या कारखान्याने पहिली उचल ३000 रुपये जाहीर केल्याने अनेक शेतकºयांनी ऊस कर्नाटकात घालविण्याची तयारी केली आहे.

गतवर्षी या कारखान्याच्या टोळ्या परिसरात आल्या होत्या. वारणा कारखान्याच्या संथ तोडी व राजारामबापू कारखान्याच्या तांत्रिक अडचणीमुळे ऊस तोड विलंबाने होत होती. याचा फायदा उचलत गतवर्षी सुमारे २८ हजार टन ऊस तोड केली होती. त्याचा पहिला हप्ता २७00 रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता, तर दुसरा हप्ता हा ३00 रुपयांनी देऊन गळीत हंगामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या वशी, लाडेगाव, कुरळप परिसरात ८ ते १0 ऊस टोळ्या ट्रॅक्टरसह उतरल्या असून येथील कार्यकर्ते उसाच्या शोधात आहेत.

हा कारखाना ऊस उत्पादकांना टनास अर्धा किलो साखर, तसेच इतर कारखान्यांच्या तुलनेत वजन-काटा बरोबर असणार असल्याचे सांगत आहे. तसेच दहाव्यादिवशी पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या नावावर जमा होणार आहे.

यावर्षी दसºयापूर्वीच या कारखान्याने ऊस तोडी सुरु केल्या होत्या. परंतु वारणा कारखान्याने काही ठिकाणच्या तोडी बंद करण्यास भाग पाडले होते. याबाबत सरकार तसेच शेतकरी संघटना गप्प आहेत. शेतकºयांच्या मालाला भाव मिळत असताना, यांनी लुडबूड करायची काय गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.

झोनबंदी नसताना ऊस उत्पादक कुठेही ऊस घालू शकतो. त्याचा तो अधिकार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. यावर्षी ऊस लवकर जाण्याने रब्बी पिके घेण्याकडे बहुतांश शेतकºयांचा कल आहे.आमचा ऊस वेळेवर, योग्य वजनाने जात असताना, स्वकष्टाने उभ्या केलेल्या पिकावर इतरांना हक्क दाखविण्याचा काय अधिकार? आमचा ऊस आम्ही कोठेही पाठवू. आमचा ऊस अडविण्याचा अधिकार कोणाला नाही.सदाशिव पाटील,ऊस उत्पादक शेतकरी.