शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

काल जेवलो, आज जेवायचे नाही का?

By admin | Updated: February 17, 2017 23:52 IST

महामार्गावरील वाहनधारकांना सवाल : कऱ्हाड पोलिसांकडून वसुली जोमात

अशोक पाटील --इस्लामपूर -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा ते कऱ्हाडपर्यंत महामार्ग पोलिसांनी पैसे वसुलीसाठी उच्छाद मांडला आहे. त्रुटी काढून वाहनांवर खटला दाखल करायचा आणि पैसे उकळून सोडून द्यायचे, असा प्रकार सुरू आहे. इस्लामपुरातील एका मालवाहतूक करणाऱ्याला कऱ्हाडच्या महामार्ग पोलिसांनी सलग दोन दिवस पकडले. दुसऱ्यादिवशी त्याने, ‘अहो कालच पैसे दिले, आज परत काय?’ असे म्हटल्यावर त्यातील एका पोलिसाने, ‘काल जेवल्यावर आज जेवत नाही का?’ असा सवाल करून पुन्हा पैसे घेतलेच!मार्च महिनाअखेर वसुली व खटल्यांचे ‘टार्गेट’, त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पोलिसांना वाहने तपासण्याचे आदेश आहेत. हे आयते कोलितच मळाल्याने, त्यांच्याकडून लुटण्याचा उद्योग सुरू असल्याचे वाहनधारक सांगतात. कायद्याचे पालन करणाऱ्यांनाही याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.सध्या महामार्गावरील वाळवा व कऱ्हाड तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या मालखेड, बेलवडे, वाळवा तालुक्यातील वाघवाडी फाट्यावर कऱ्हाड येथील महामार्ग पोलिस वाहन तपासणीच्या निमित्ताने थांबलेले दिसतात. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या कणेगाव येथेही कुरळप पोलिस ठाण्याचे पोलिस दिसतात. ते दररोज वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचे, वाहनधारकांनी सांगितले. एखाद्याने कायद्याची भाषा सुरू केली की, त्याला दंडाची पावती दिली जाते.चार दिवसांपूर्वी असाच प्रकार इस्लामपूर येथील वाहनधारकाशी घडला. वाघवाडी येथे वाहनांची तपासणीसाठी उभ्या असलेल्या कऱ्हाड येथील पोलिसांनी त्याच्याकडून पैसे उकळले होते. पुन्हा दुसऱ्यादिवशी त्याच वाहनाला अडवून याच पोलिसांनी पैशाची मागणी केली. त्यावर या वाहनधारकाने, ‘अहो साहेब, कालच पैसे दिले, आज परत कशाला पैसे मागता?’ असा प्रश्न विचारला. त्यावर एका पोलिसाने, ‘काल जेवल्यावर आज भूक लागत नाही का?’ असा प्रतिसवाल करून पैसे घेतलेच. वाहनधारकांकडे सर्व कागदपत्रे असतानाही, त्रुटी काढून पैशाची मागणी होती. याला वाहनधारक कंटाळले असून, सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांनी कऱ्हाडच्या पोलिसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.एक आणि दोन नंबर बॅचकऱ्हाड महामार्ग पोलिस विभागात एकूण ३४ पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. येथे १७-१७ पोलिसांच्या दोन बॅच कार्यरत आहेत. एक बॅच २४ तास सेवा करते. त्यानंतर दुसरी बॅच २४ तास महामार्गावर सेवा देते. परंतु यातील पहिली बॅच पैसे उकळण्यात आणि वाहनधारकांना त्रास देण्यात तरबेज आहे.