शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कवठेमहांकाळमध्ये यंदाचा उन्हाळा सुखावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

फोटो ओळी : बोरगाव (ता. कवठे महांकाळ) येथील तलावात सध्या पाणीसाठा शिल्लक असल्याने परिसरातील नागरिकांना याचा दिलासा मिळाला आहे. ...

फोटो ओळी : बोरगाव (ता. कवठे महांकाळ) येथील तलावात सध्या पाणीसाठा शिल्लक असल्याने परिसरातील नागरिकांना याचा दिलासा मिळाला आहे.

जालिंदर शिंदे

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात गतवर्षी मुबलक पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील सर्व बंधारे,

विहिरी, ओढे, नाले व तलावात चांगला पाणीसाठा निर्माण झाला होता. परिणामी, ऐन उन्हाळ्यातही दोन तलाव वगळता उर्वरित नऊ तलावात अद्याप पाणीसाठा चांगला टिकून आहे. त्यामुळे तलावांच्या लाभक्षेत्रातील ३९३२ हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात नेहमीच उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत असतो. द्राक्ष पिकास तर विकतचे पाणी घ्यावे लागते; मात्र गेल्या वर्षी झालेल्या वरुणराजाच्या कृपेने तालुक्यात विहिरी, बंधारे, ओढे,

नाले व तलावात भरपूर पाणीसाठा झाला. त्यामुळे आपसुकच भूजल पातळीतही कमालीची वाढ झाली.

द्राक्ष व धान्य पिकांसाठी पाणीसाठा उपयुक्त ठरला. ही पिकेही पार पडली. तालुक्यात दहा लघु व एक मध्यम असे अकरा तलाव आहेत. पैकी सध्या लांडगेवाडी व हरोली या दोन तलावातील पाणी साठा कमी झाला आहे; मात्र उर्वरित तलावात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे द्राक्ष व धान्य पिकासाठी पाणीसाठा उपयोगी पडेल व उन्हाळ्यात शेतीसाठीही या पाण्याचा लाभ होईल.

सध्या कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावात उपलब्ध पाणीसाठा (द.ल.घ.फू.मध्ये) व तलावांचे सिंचन लाभक्षेत्र कंसात (हेक्टर मध्ये) पुढीलप्रमाणे कुची ३८.७५ (३९२),

रायवाडी ६७.५१ (३९६), लांडगेवाडी ०२.६९ (३३५), लंगरपेठ ३६.६० (२३५), नांगोळे १०.००- (१४८),

बोरगाव १२.७८ (२५२), हरोली ०७.१६ (१३१), दुधेभावी ८६.८६ (६९७), घोरपडी ३७.६१ (१९८), बंडगरवाडी १८.९१ (२८६), बसप्पावाडी २०२.३८ (८६२).

चौकट

तलावांची डागडुजी गरजेची

तालुक्यातील अकरा मोठे तलाव वगळता अनेक गावात बरेच इतरही काही छोटे-मोठे तलाव आहेत. तेही तलाव गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते; पण बऱ्याच वर्षांपासून या तलावांची कामे न केल्याने पाणी गळतीने ते आज कोरडे ठणठणीत पडले आहेत. याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे.