शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

यशवंतरावांच्या जन्मघर स्मारकाचे आज उद्घाटन

By admin | Updated: June 26, 2014 00:26 IST

दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती : सह्याद्रीचे वारे जनआवृत्तीचेही प्रकाशन

कडेगाव/देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे गुरुवारी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दुपारी चार वाजता होणार आहे. यावेळी ‘सह्याद्रीचे वारे’ या यशवंतराव चव्हाण यांच्या भाषण संग्रहाच्या जनआवृत्तीचे प्रकाशनही होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती आहे.यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाने कोट्यवधी रुपयांची विकासकामे देवराष्ट्रे येथे मंजूर केली. ही कामे अद्यापही सुरू आहेत. अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. यामुळे देवराष्ट्रे आता ‘यशवंतमय’ झाले आहे.देवराष्ट्रे येथील यशवंतरावांचे जन्मघर पुनरुज्जीवित करून त्याचे स्मारकात रूपांतर झाले आहे. स्मारकातील सहा खोल्यामध्ये दालन तयार केली आहेत. घराच्या अत्यंत कमी जागेत छायाचित्रे व चित्ररूपाने त्यांची कारकीर्द दाखविली आहे. यशवंतरावांचे विचारधन लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने घराच्या स्वागत कक्षात त्यांची पुस्तके, भाषणसंग्रह, भाषणाच्या सीडी उपलब्ध करून दिल्या आहेत.हे जन्मघर पुरातत्त्व विभागाकडे होते. परंतु त्यांनी या जन्मघराची व्यवस्था अपेक्षेप्रमाणे होणार नाही, असे कळविले. यावर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने २००७ मध्ये महाराष्ट्र वैभव संगोपन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी या जन्मघराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मागितली. यावर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या तज्ज्ञ सल्लागार समितीच्या शिफारशीने ११ मार्च २०१४ करार झाला आणि या जन्मघराची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आली. कोल्हापूर येथील गजबर अ‍ॅड असोसिएट्स यांनी प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतरावांचे जन्मघर कसे दिसेल, याचे सादरीकरणही शासनाच्या तज्ज्ञ समितीसमोर केले होते. या सर्व घडामोडीनंतर या जन्मघराचा ताबा प्रतिष्ठानकडे आला. आता हे जन्मघर यशवंतरावांचा चालता-बोलता इतिहास दर्शवित आहे. (वार्ताहर)