शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बेदाण्याची पट्टी २१ दिवसात मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकºयांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाºयांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सांगली बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिला. सौद्यावेळी करण्यात येणारी बेदाण्याची उधळण थांबविण्यास व्यापाºयांनी सहमती दर्शविली. बेदाणा बॉक्सच्या पैशाबाबत राज्यातील पाच बाजार समित्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकºयांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाºयांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सांगली बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिला. सौद्यावेळी करण्यात येणारी बेदाण्याची उधळण थांबविण्यास व्यापाºयांनी सहमती दर्शविली. बेदाणा बॉक्सच्या पैशाबाबत राज्यातील पाच बाजार समित्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी व शेतकºयांची शुक्रवारी संयुक्त बैठक झाली. सभापती प्रशांत शेजाळ, सचिव प्रकाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, संदीप राजोबा, व्यापारी प्रतिनिधी सुशील हडदरे, मुजीर जांभळीकर, प्रशांत पाटील-मजलेकर उपस्थित होते.स्वाभिमानी श्ेतकरी संघटनेने बेदाण्याला हमीभाव मिळावा, बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत पैसे द्यावेत, सौदे करत असताना बेदाण्याची उधळण थांबवावी आदी मागण्या बाजार समितीकडे केल्या होत्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत शेतकºयांना पैसे द्यावेत, अशा सूचना सभापती शेजाळ यांनी व्यापाºयांना दिल्या. विलंबाने पैसे दिले, तर शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर संबंधित व्यापाºयांवर कारवाई केली जाईल.सौद्यावेळी बेदाण्याची होणारी उधळण थांबविण्यात येईल, असे व्यापाºयांनी बैठकीत मान्य केले.बाजार समितीमध्ये हळद संशोधन केंद्र आहे, त्याच धर्तीवर बेदाण्याचे संशोधन केंद्र उभे करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, लवकरच त्याला मान्यता मिळेल. यामुळे बेदाण्यासाठी वापरण्यात आलेले गंधकाचे प्रमाणात समजण्यास मदत होईल. त्यातून चांगल्या बेदाण्याला वाढीव दर मिळेल.शेतकºयांच्या बेदाण्याची अडीचशे ग्रॅमपेक्षा जादा घट धरली जाते, त्याबाबत आक्षेप घेण्यात आला. त्यावर अडीचशे ग्रॅमपेक्षा जादा घट धरली जाणार नाही, अशी ग्वाही व्यापाºयांनी बैठकीत दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडाफोडीचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. व्यापाºयांत घबराट निर्माण होईल, अशा पद्धतीने आंदोलन करू नये, अशी विनंती संघटनेला करण्यात आली.शेजाळ म्हणाले की, शीतगृहावर बेदाण्याचे सौदे होतात. मात्र, यामध्ये मोठ्याच शेतकºयांच्या बेदाण्याला अधिक दर मिळतो. यावर बाजार समितीचे नियंत्रण असावे, अशी मागणी केली आहे. त्यानुसार शीतगृह चालकांशी बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार आहे. त्याचप्रमाणे बेदाणा बॉक्सचे पैसे शेतकºयांना द्यावे लागत आहेत. याबाबत सांगली, तासगाव, पिंंपळगाव, पंढरपूर या बाजार समित्या एकत्र येऊन १ सप्टेंबरला बैठक घेण्याचा निर्णय झाला.सप्टेंबरमध्ये हैदराबादला बैठक : शेजाळबेदाणा, हळद हा शेतीमाल आहे. बेदाणा आणि हळदीला केंद्र सरकारने जीएसटी लागू आहे. याचा परिणाम व्यवहारांवर झाला आहे. यामुळे जीएसटी वगळण्यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार आहे. शनिवार (ता. ९) सप्टेंबरला हैदराबाद येथे जीएसटीबाबत बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीला बाजार समितीचे पदाधिकारी जाणार आहेत. त्यात बेदाणा आणि हळदीवरील जीएसटी वगळा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी सांगितले.