शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

येलूरमध्ये बापाकडून मुलाचा कुऱ्हाडीने खून

By admin | Updated: March 13, 2016 01:00 IST

कुऱ्हाडीने घाव

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे शुक्रवारी रात्री ३३ वर्षीय व्यसनी मुलाचा बापाने कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर संशयित बापाने पलायन केले होते. रात्री उशिरा त्यास अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमर शंकर पाटील (वय ३३, रा. कोणोली वसाहत, येलूर) असे मृताचे नाव आहे. त्याच्या डोक्यात, तोंडावर, गळ्यावर, पोटावर कुऱ्हाडीचे आठ घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. अमर हा वडील शंकर गणपती पाटील (वय ५५) यांच्यासोबत राहत होता. मृत अमर याला दारूचे व्यसन होते. तो वडिलांना त्रास देत असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. शुक्रवारी रात्रीही तो दारू पिऊनच घरी आला होता. शेतजमीन वाटून पाहिजे यासह इतर अनेक कारणांसाठी तो वडिलांशी वाद घालत होता. त्यामुळे वडीलही त्याच्या त्रासास कंटाळले होते. घरी आल्यानंतर अमर झोपला असता मध्यरात्री ते पहाटेदरम्यान कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. याबाबत त्याचा भाऊ प्रवीण शंकर पाटील याने कुरळप पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये अज्ञाताने खून केल्याचे म्हटले होते, मात्र घटना घडल्यानंतर वडील शंकर पाटील हे घरातून निघून गेल्याने त्यांच्यावर संशय बळावला. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. (वार्ताहर)