शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वायफळच्या दिव्यांगाने कळसुबाई शिखर केले सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:33 IST

सांगली : वायफळ (ता. जत) येथील दिव्यांग अंकुर दुर्योधन यादव-पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च कळसुबाई शिखर ...

सांगली : वायफळ (ता. जत) येथील दिव्यांग अंकुर दुर्योधन यादव-पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले. दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५४०० फूट प्रवास करीत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. त्यांना नाशिकचे अंध सागर बोडके यांनी साथ दिली.सागर बोडके यांनी वर्षातून २१ वेळा कळसुबाई शिखर सर केले आहे. अंध असूनही त्यांची ही जिद्द पाहून अंकुर यादव यांनी हे शिखर सर करण्याची मनीषा व्यक्ती केली होती. ७ एप्रिल रोजी बोडके यांची अकरावी फेरी होती. त्यांनी यादव यांना मोबाईलवर संपर्क साधून, ‘येणार आहे का’, अशी विचारणा केली. यादव यांनी होकार दिला. बोडके यांच्यासोबत शिखर सर करण्याची त्यांना संधी मिळाली होती. नाशिकहून प्रवास करून पायथ्याच्या बारी गावातून सकाळी सहा वाजता बोडके व यादव निघाले. जहाँगीरवाडीच्या माची मंदिरात कळसूमातेचे दर्शन त्यांनी घेतले. पाठीला सात ते आठ किलो साहित्य असलेली बॅग घेऊन शिखर सर करण्याचा त्यांचा प्रवास सुरु झाला. बोडके हे यादव यांना सांभाळत मुख्य वाटेला लागले. पुणे-मुंबईतील बरेच ग्रुप आले होते. एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडीमार्गापर्यंत ते पोहोचले. तोल सावरत, कधी बोडके यांचा हात धरुन, तर कधी दोघे मागे-पुढे होत शिखर सर केले. वाटेत भेटणाऱ्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छाही दिल्या. १३६० मीटर उंची गाठल्यानंतर झाडाखाली दोघेही विसावले. पाणी पिऊन पुन्हा ते पुढील प्रवासाला लागले. सकाळी ेदहा वाजता १६४० मीटर उंचीचे (५ हजार ४०० फूट) सर्वोच्च कळसुबाई शिखर त्यांनी सर केले.परतीचा प्रवासही तसाचबोडके व यादव यांचा परतीचा प्रवासही तसाच झाला. बारा वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. दुपारी तीन वाजता ते शिखरावरुन उतरले. कळसूमातेच्या दर्शनाची आस व जिद्दीने शिखर सर केल्याचा यादव यांना आनंद झाला. हे शिखर सर करताना दिव्यांग आहोत, हे विसरून गेल्याचे त्यांनी सांगितले.