शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत लावणी स्केटिंगचा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:22 IST

सांगली : सांगलीतील बालस्केटिंगपटू सई पेटकरने रविवारी सलग एक तास लावणी स्केटिंगचा नवा विश्वविक्रम नोंदविला. वंडर बुक, जिनिअस बुक, ...

सांगली : सांगलीतील बालस्केटिंगपटू सई पेटकरने रविवारी सलग एक तास लावणी स्केटिंगचा नवा विश्वविक्रम नोंदविला. वंडर बुक, जिनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड अशा चार पुस्तकांमध्ये तिच्या या विक्रमाची नोंद केली जाणार आहे.सांगलीच्या कल्पद्रुम क्रीडांगणावर सायंकाळी सहा वाजता या विश्वविक्रमी उपक्रमास सुरुवात झाली. यावेळी महापौर संगीता खोत, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, आरबोळे स्केटिंग अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रा. शिवपुत्र आरबोळे, प्रशिक्षक शैलेश पेटकर उपस्थित होते.महाराष्टÑीयन नृत्यकलेला खेळाची जोड देत अनोख्या संगमातून एक नवा स्केटिंग प्रकार या माध्यमातून समोर आला आहे. स्केटिंगवर नृत्य सादर करण्याचे प्रकार यापूर्वी झाले असले तरी, लावणीच्या ठेक्यावर तासभर स्केटिंगचा हा उपक्रम नवीन असल्याने, सांगलीकर रसिक, क्रीडाप्रेमी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची गर्दी झाली होती. प्रत्येक नृत्यप्रकारावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. एकूण अकरा लावण्यांचा समावेश या उपक्रमात होता. न थांबता सई लावणीच्या तालावर स्केटिंगद्वारे नृत्य सादर करीत होती. ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘मला जाऊ द्या ना घरी’, ‘दिसला गं बाई दिसला’ अशा एकापेक्षा एक बहारदार लावण्यांवर स्केटिंगसह थिरकणाऱ्या सईने उपस्थितांची मने जिंकली. एक तासानंतर तिची पावले थांबल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सांगली ही क्रीडापंढरी म्हणूनही नावारुपास आली आहे. अन्य क्रीडाप्रकारांबरोबरच गेली अनेक वर्षे सांगलीच्या स्केटिंगच्या क्षेत्रात अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. त्यात सई पेटकरने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. ती वसंत प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे. तिचा हा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी वंडर बुक, जिनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड या चार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सहा महिन्यांपासून सरावन थांबता तासभर लावण्यांवर स्केटिंगसह नृत्य सादर करणे हे कठीण काम आहे. त्यामुळे या प्रकारात सराव महत्त्वाचा होता. सईने यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दोन तास सराव केला. या सरावामुळे तिला हा विक्रम करणे साध्य झाले.