शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:22 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...कामगार नेते विकास मगदूम यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूकचळवळीतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?निवडणुकांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. कोणताही पक्ष असला तरी त्यांना विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती बांधणे एवढाच वाटत आहे. याउलट जीवनमान उंचाविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. देशात ४२ कोटींच्या वर असणाऱ्या कष्टकरी जनतेकडे कोणी लक्ष देत नाही. समाजातील आवश्यक प्रश्न बाजूला पडले आहेत.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सकल राष्टÑीय उत्पादनात ६५ टक्के योगदान असणाºया कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळत नाही. काम करत आहे तोवरच तुटपुंजे उत्पन्न. मात्र, थकल्यानंतर त्यांच्या अन्न, औषधांचीही आबाळ होताना दिसते. संविधानानुसार जसे सन्मानाने जगता आले पाहिजे, तसेच सन्मानाने मरणही आले पाहिजे. असा दिलासा देणारा मुद्दा कोणीही विचारात घेत नाही. शेतकऱ्यांनाही केवळ कर्जमाफी न देता त्यांना वेळेवर पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?स्वातंत्र्यापासूनच कामगारवर्ग आपल्या हक्कासाठी लढत आहे. १९९१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, प्रशासकीय वर्ग सोडला, तर चळवळीला भवितव्य उरलेले नाही. अनेक कामगारांना साप्ताहिक सुटी नाही, १३ ते १४ तास काम करावे लागते. विशेष म्हणजे देशात संख्येने बहुसंख्य असलेल्या कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यांनी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?नवमतदारांनी आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यास पुढे यावे. राजकीय व्यवस्थेविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी पाच वर्षांतून एकदा संधी मिळते. ही संधी तरूणांनी वाया घालवू नये.