शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

रक्षाविसर्जनप्रसंगी कार्यकर्ते शोकाकुल : वांगीत हजारोंची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:53 IST

वांगी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल व भावपूर्ण वातावरणामध्ये

ठळक मुद्देपतंगराव कदम यांना सहकार, शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची श्रध्दांजली

वांगी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल व भावपूर्ण वातावरणामध्ये सोमवारी सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर पार पडला. यावेळी राज्यातील सहकार, शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

शुक्रवार दि. ९ मार्च रोजी डॉ. पतंगराव कदम यांचे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये निधन झाले. शनिवारी सायंकाळी वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी लाखो लोकांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. डॉ. कदम यांच्या आकस्मिक जाण्याने जिल्ह्यात व राज्यात शोककळा पसरली होती. सोमवारी, १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्यांचे रक्षाविसर्जन पार पडले. यावेळी अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, डॉ. कदम आपल्यात राहिले नाहीत, यावरच विश्वास बसत नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्बेतेची धाकधुक होती. पण असे काही घडेल असे वाटले नव्हते. ज्या व्यक्तीने अनेकांना नोकºया दिल्या, शिक्षण दिले, संसार फुलविले, प्रेम दिले, आधार दिला, त्या माणसाचे प्राण वाचविण्यासाठीसुध्दा ही पुढारलेली वैद्यकीय सेवा अपुरी पडली.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांच्या जाण्याने बहुजनांचा व सर्वसामान्यांचा आधार हरवला आहे. त्यांनी जिल्ह्याला व राज्याला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले होते.शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी समाजाचे संसार चालविले होते. देश, धर्म व समाजाबद्दल अपार भाव मनी असणारा हा माणूस होता. त्यांच्या अंत:करणात करूणा, जिव्हाळा, आपुलकीचे भाव होते. देशभक्त, लोकभक्त व समाजभक्त हरपला आहे.

आ. अनिल बाबर, आ. बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. सदाशिवराव पाटील, माजी आ. रमेश शेंडगे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, धीरज देशमुख (लातूर), हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, माजी महापौर इद्रिस नायकवडी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राजाराम गरूड, रवींद्र बेडकिहाळ यांनीही श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पुणे जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, कॉँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार उमाजी सनमडीकर, प्रतापशेठ साळुंखे, युवा नेते डॉ. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महानिरीक्षक रामराव पवार, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, वस्त्रोद्योग संघाचे माजी अध्यक्ष राजाराम पाटील, जे. के. बापू जाधव, विनोद गुळवणी, बाबासाहेब मुळीक, ‘मनमंदिर’चे अशोक गायकवाड, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष लालासाहेब यादव, कवयित्री स्वाती शिंदे-पवार, सुहास शिंदे, युवक कॉँग्रेसचे इंद्रजित साळुंखे, एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष राजीव मोरे, जयदीप भोसले, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, व्ही. वाय. पाटील, आनंदराव मोहिते, भीमराव मोहिते उपस्थित होते.कार्यकर्त्यांना मिळणार अस्थींचे दर्शनकडेगाव : भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश बुधवार, दि. १४ ते १९ मार्च या कालावधित कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व गावांमध्ये, तसेच सांगली शहरासह जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी जाणार आहे. गावा-गावांतील कार्यकर्ते व चाहत्यांना दर्शन घेता यावे, यासाठी अस्थिकलश ठेवला जाणार आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेता आले नाही, अशा गावा-गावातील कार्यकर्त्यांना व चाहत्यांना किमान अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. डॉ. पतंगराव कदम यांचे दोन अस्थिकलश दर्शनासाठी बुधवारी गावोगावी रवाना होणार आहेत. यापैकी एक अस्थिकलश कडेगाव व पलूस या दोन तालुक्यातील गावोगावी जाणार आहे, तर दुसरा अस्थिकलश सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता अस्थिकलश सोनसळ येथून रवाना होणार आहे. अस्थिकलश शिरसगाव येथे ८.१० वाजता पोहोचणार आहे. सोनकिरे येथे ९ वाजता, पाडळीत ९.४०, वाजेगाव १०.१०, आसद १०.३५, मोहित्यांचे वडगाव ११.२०, अंबक १२.००, शिरगावला दुपारी ४.००, रामापूर ४.४०, देवराष्ट्रे ५.४०, वांगी ६.५५, चिंचणीत रात्री ८.०० वाजता. गुरुवार दि. १५ रोजी सकाळी ८.०० वाजता तडसर येथे, तर नेर्लीत ८.५०, कोतवडे ९.२०, अपशिंगे १०.००, खंबाळे (औंध) १०.५०, शिवाजीनगर ११.३०, रेणुशेवाडी १२.००, विहापूर १२.३५, करांडेवाडी ४.००, बोंबाळेवाडी ४.३५, रायगाव ५.०५, वांग रेठरे ५.५०, शाळगाव ६.३०, येडेउपाळे ७.१०, बेलवडे ७.४०, निमसोड ८.१०. शुक्रवार दि. १६ रोजी कडेपूरला सकाळी ८.०० वाजता, सोहोली ८.४०, सासपडे ९.२०, उपाळे (मायणी) १०.००, उपाळे वांगी १०.४०, हिंगणगाव बुद्रुक ११.१०, ढाणेवाडी १२.००, खेराडेवांगी १२.३५, तोंडोली १.१५, चिखली ४.००, अमरापूर ४.३०, शिवणी ५.१५, येवलेवाडी ६.००, हणमंतवडिये ६.३०, कडेगाव ७.२०. शनिवार दि. १७ रोजी सकाळी ८.०० वाजता खेराडे विटा, त्यानंतर भिकवडी ८.३०, कोतीज ९.१५, येतगाव ९.५०, कान्हरवाडी १०.२५, तुपेवाडी ११.०५, नेवरी ११.४५, आंबेगाव १२.४०, वडियेरायबाग १.१०, शेळकबाव १.५५, हिंगणगाव खुर्द २.३५, कुंभारगाव येथे ४.००.बुधवारी दशक्रिया, तर शुक्रवारी उत्तरकार्य विधीबुधवार, दि. १४ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता सोनसळ येथे दशक्रिया विधी होणार आहे, तसेच शुक्रवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सोनसळ येथे उत्तरकार्य विधी होणार आहे.