शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची जुंपली

By admin | Updated: October 23, 2016 00:44 IST

आघाडीबद्दल मतभेद : जितेंद्र पाटील-विजय पवार यांच्यात ‘तू-तू मैं-मैं’

सांगली : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित सांगलीतील कॉँग्रेसच्या बैठकीत शनिवारी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील आणि युवक कॉँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पवार यांच्यात जुंपली. येथील कॉँग्रेस भवनात शनिवारी दुपारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. वाळवा तालुक्यातील कॉँग्रेसअंतर्गत संघर्षाचे पडसाद शनिवारी कॉँग्रेसच्या जिल्हा बैठकीतही उमटले. जितेंद्र पाटील यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात मत मांडले. आघाडी केल्यास कॉँग्रेसला फायदा होऊ शकतो. आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडी करावी. तुल्यबळ उमेदवार पक्षाने द्यावेत, अशी सूचना मांडली. त्यावर विजय पवार यांनी असे राजकारण बंद करा, असा संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, सोयीचे राजकारण किती दिवस चालणार? दुसऱ्याने सांगितले म्हणून आघाडी करायची आणि हवे तेव्हा स्वबळाची भाषा करायची, हे प्रकार थांबले पाहिजेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा बॅँकेत भाजपशी केलेली युती चालते आणि कॉँग्रेसने अशी युती केली की लगेच याच लोकांनी तत्त्वाची भाषा करायची. हे आता थांबवायला पाहिजे.पवार यांनी हे मत मांडल्यानंतर राजेंद्र पाटील आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून मिरज तालुक्यातील राजकारणापर्यंतची उणी-दुणी काढण्यात आली. दोन्ही कॉँग्रेस नेत्यांमधील हा वाद मिटविण्यासाठी प्रदेश कॉॅँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी मध्यस्थी केली. दोघांनाही शांत करून त्यांनी बैठकीची चर्चा पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. मोहनराव कदम यांनी आगामी नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार हाफिज धत्तुरे, महापालिकेतील कॉंग्रेसचे सभागृह नेते किशोर जामदार, प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, महिला कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा वहिदा नायकवडी, मालन मोहिते, सुरेश मोहिते, अमरसिंह पाटील, सुभाष खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भीमराव माने कॉँग्रेस भवनातशिवसेनेचा राजीनामा दिलेले जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने शनिवारी अचानक कॉँग्रेस भवनात दाखल झाल्याने दिवसभर चर्चेचा विषय ठरला. यावेळी कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या कॉँग्रेस प्रवेशाचीही चर्चा रंगली होती. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माने म्हणाले की, सांगली-सातारा विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. कदम यांच्याबद्दल सर्वच पक्षातील लोकांना आदर आहे. यासंदर्भात त्यांनी कॉँग्रेस भवनमध्ये येऊन भेटण्याची विनंती केली होती. त्यामुळेच मी कॉंग्रेस कमिटीमध्ये उपस्थित राहिलो. पक्षप्रवेशाचा या उपस्थितीशी काहीही संबंध नाही. दादा घराण्याकडून अन्याय!जितेंद्र पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीचा दाखला देत दादा घराण्याने आमच्यावर अन्याय केला असून, उमेदवारी मिळाली असताना ऐनवेळी आम्हाला अडचणीत आणले, अशी भावना व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शैलजाभाभी पाटील यांच्यासमोरच त्यांनी हे मत मांडले.