शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

फोटो-१५०४२०२१आयएसएलएम-चिंचोली न्यूज १ व २ चिंचोली (ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील तीव्र वळण आहे. हे तीव्र वळण कमी करण्याचे ...

फोटो-१५०४२०२१आयएसएलएम-चिंचोली न्यूज १ व २

चिंचोली (ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील तीव्र वळण आहे. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरू करण्यात आले आहे.

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : चिंचोली (ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी केली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठविला होता. या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे आणि गटारीचे सुधारित काम सुरू केले आहे.

सध्या या तीव्र वळणावरील फरशी पुलाच्या उत्तरेकडील बाजूने गटाराचे बांधकाम करत तीव्र वळण कमी करण्याचे काम सध्या केले जात आहे; परंतु दक्षिण दिशेला बांधण्यात असलेल्या गटाराचे काम नियमानुसार केले नसल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

या तीव्र वळणावरील फरशी पुलाची रुंदी कमी असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली होती, कारण यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने त्यात काहींचे प्राणही गेले होते. त्यातच रस्त्यातून गटाराचेही बांधकाम करून या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.

कराड ते रत्नागिरी असा हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यात आता या मार्गाचे रुंंदीकरण झाल्याने वाहतुकीत खूप मोठी वाढ होणार आहे.

चौकट

सामाजिक बांधीलकी

संवेदनशील चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी या फरशी पुलाला डबल नळे टाकण्यासाठी या आधीही संघर्ष केला होता. आता हे तीव्र वळण कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करून या वळणाचे रुंंदीकरण करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांना गावातील युवकांनी चांगली साथ दिली.