शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात भर पावसात महिलांचा मोर्चा

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

नागपंचमीचा वाद : जिवंत नागाची पूजा करण्यास मान्यतेची मागणी; सलग तिसऱ्या दिवशीही बंद

शिराळा : ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’, ‘आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी द्या’ अशा घोषणा देत शेकडो शिराळकर महिलांनी आज, शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. नागपंचमी सुरू राहण्यासाठी परवानगी मिळावी, या आशयाचे निवेदन तहसीलदारांना दिले. या मोर्चात पावसात भिजत कडेवर लहान मुले घेतलेल्या व वृद्ध महिलांचाही मोठा सहभाग होता. शिराळा शहरात आज तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. उच्च न्यायालयाने जिवंत नाग पकडणे, पूजा करणे यावर बंदी घातल्याने बुधवार दि. १६ पासून शिराळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज दुपारी बाराच्यादरम्यान शेकडो महिलांनी ग्रामदैवत श्री अंबामाता मंदिरापासून घोषणा देत सोमवार पेठ, कुरणे गल्ली, गुरुवार पेठ, पूल गल्ली, एसटी बसस्थानक या मार्गावरून मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यावर नायब तहसीलदार समीर यादव यांना निवेदन दिले. निवेदन देताना सौ. श्वेता नलवडे यांनी सांगितले की, नाग हा आमचा भाऊ आहे. त्याची पूजा करणे हा आमचा हक्क आहे. आम्ही नागपंचमीदिवशी उपवास करतो. तो उपवास जिवंत नागाची पूजा व दर्शन केल्यावरच सोडतो. त्यामुळे यावर्षी जर नागपूजा करता आली नाही, तर आम्ही उपवास सोडणार नाही. शिराळ्याच्या नागपंचमीमुळे निसर्ग दूषित होत असेल, तर आम्ही पर्यावरणवाद्यांना आव्हान देतो की, त्यांनी इतर संस्कृतीहीन घटना बंद करून दाखवाव्यात. या मोर्चामध्ये अनघा शिंदे, सविता नलवडे, संगीता साळुंखे, प्रा. प्रज्ञा काकडे, जयश्री कवठेकर, मनीषा नलवडे, जयश्री पाटील, नंदाताई कदम, स्मिता डांगे, माधुरी शिंदे, विद्या गायकवाड, सखुबाई शेणेकर यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चावेळी नागपंचमीची गीतेही महिलांनी म्हटली. आज तिसऱ्या दिवशीही शिराळकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. उद्या, दि. १९ रोजी ग्रामदैवत अंबामातेस ग्रामस्थांच्यावतीने महाअभिषेक घालण्यात येणार आहे. (वार्ताहर) -मोर्चा निघाल्यापासून पाऊस पडत होता. मात्र या पावसाची जराही पर्वा न करता लहान मुलांना कडेवर घेतलेल्या महिला, वृद्ध महिला, युवती यांच्यासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एवढा मोठा महिलांचा मोर्चा पहिल्यांदाच काढण्यात आला. -मोर्चावेळी नागपंचमीची गीतेही महिलांनी म्हटली. आज तिसऱ्या दिवशीही शिराळकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.