शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

By admin | Updated: May 11, 2017 23:23 IST

दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या कडेगाव येथील रणरागिणींनी नगरपंचायत व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि थेट शहरातील सर्व दारू दुकाने तसेच बिअर बारना टाळे ठोकले. गुरुवारी सकाळी १० वाजता अचानक संतप्त शेकडो महिला व ग्रामस्थ शिवाजी चौकात एकत्र आले. त्यानंतर दारूची बाटली आडवी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत कडेगाव नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नगरसेविका अश्विनी वेल्हाळ-परदेशी, अनिता देशमुखे, शांता घाडगेंसह शेकडो महिलांनी, ग्रामस्थांनी भाग घेतला. मात्र आजच्या आज दारू दुकाने बंद झाली पाहिजेत, असा आग्रह संतप्त महिलांनी धरला आणि तेथून हा मोर्चा थेट बाजारपेठेतील दारू दुकानाकडे वळला. तेथील देशी दारूच्या दुकानाला टाळे ठोकल्यानंतर आंदोलकांनी शहरातील सर्व बिअर बारनाही टाळे ठोकले. यापूर्वी कडेगावातील संतप्त महिलांनी कडेगाव येथील अन्य एका दारूच्या दुकानाला टाळे ठोकले होते. तेव्हा कडेगावातील सर्व दारू दुकाने बंद करावीत म्हणून तहसीलदार अर्चना शेटे यांना निवेदन दिले होते. परंतु शासनपातळीवर तसे न केल्याने महिलांनी दारू दुकाने बंद केली.यावेळी अश्विनी वेल्हाळ-परदेशी, शुभांगी डांगे, संजीवनी डांगे, राजश्री पतंगे, शरयू गायकवाड, सुलोचना मोरे, कविता जरग, सरिता गाढवे, संगीता जाधव, चिमुताई जाधव, अंजली गायकवाड यांच्यासह महिला आंदोलनात सहभागी होत्या.ठराव शासनाकडे पाठवूनगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या की, मी तुमच्याशी सहमत आहे. दारू दुकाने बंद करण्यात यावीत, म्हणून ठराव मंजूर करून तो पाठविला जाईल.