शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदगावात सशस्त्र दरोड्यात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापकाच्या पत्नीला निर्घृणपणे ठार मारून दरोडेखोरांनी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोकड अशी आठ लाख रुपयांची लूट केली. अरुणा बाबूराव निकम (वय ५६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, निवृत्त प्राध्यापक बाबूराव नारायण निकम (६३) हेदेखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापकाच्या पत्नीला निर्घृणपणे ठार मारून दरोडेखोरांनी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोकड अशी आठ लाख रुपयांची लूट केली. अरुणा बाबूराव निकम (वय ५६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, निवृत्त प्राध्यापक बाबूराव नारायण निकम (६३) हेदेखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, उदगाव-शिरोळ मार्गावर निकम मळा आहे. येथे बाबूराव, बळवंत व बंडू या तिघा भावांचे एकमेका शेजारीच तीन बंगले आहेत. यातील बाबूराव निकम हे चंद्राबाई शेंडुरे ज्युनिअर कॉलेज, हुपरी (ता. हातकणंगले) येथून दोन वर्षांपूर्वी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना प्रवीण व प्रीतम ही दोन मुले आहेत. रविवारी (दि. १३) निकम कुटुंबीय प्रीतम यांच्या मुलीच्या बारशासाठी खेराटे-वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून सायंकाळी सात वाजता सर्वजण उदगावला परतले. दरम्यान, जेवण करून रात्री साडेनऊच्या सुमारास सर्वजण झोपी गेले.मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी टेरसवरुन घरात प्रवेश केला. टेरेसजवळील खोलीत प्रीतम झोपले होते. या खोलीस बाहेरून कडी लावून दरोडेखोर जिन्यातून घराच्या हॉलमध्ये आले. हॉलच्या पलीकडील बेडरूममध्ये बाबूराव यांचा मोठा मुलगा प्रवीण, त्यांची पत्नी सरिता व मुलगी प्रणिता व लहान बाळ झोपले होते. त्याही दाराला चोरट्यांनी बाहेरून कडी घातली. त्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या अरुणा यांच्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने चेहºयावर वार केल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हॉल शेजारील दुसºया बेडरूममध्ये झोपलेल्या बाबूराव निकम यांच्यावरही धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. यानंतर दरोडेखोरांनी बाबूराव यांच्या बेडरूममध्ये असलेल्या दोन लोखंडी कपाटातील दोन तोळ्यांची कर्णफुले, अडीच तोळ्यांच्या दोन चेन, तीन तोळ्यांच्या चार अंगठ्या, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, लहान बाळाचे दोन तोळ्यांचे दागिने, तर अरुणा यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, हातातील बिलवर व पाटल्या असे एकूण २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे दागिने व रोख पन्नास हजार, असा एकूण सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.एवढी भीषण घटना घडूनही याचा थांगपत्ता घरातील मुलांना नव्हता. सकाळी सहाच्या सुमारास बाबूराव यांचा मोठा मुलगा प्रवीण उठला असता बेडरूमला बाहेरून कडी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रवीणने पहिल्या मजल्यावरील भाऊ प्रीतमला फोन केला. तो उठला असता त्याच्याही रूमला बाहेरून कडी होती. त्यांनतर या दोघा भावांनी शेजारी असलेला चुलत भाऊ राजू निकम यास फोन करून बोलाविले. राजू यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार थरारक प्रकार उघडकीस आला.हॉलमध्ये अरुणा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर बेडरूममध्ये बाबूराव निकम गंभीर अवस्थेत होते. त्यानंतर बाबूराव यांना तत्काळ मिरज मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, कोेल्हापूर गुप्तचर विभागाचे डी. एन. मोहिते, इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाचे शहाजी निकम, शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्यासह शंभरहून अधिक जणांचा पोलीस फौजफाटा व ट्रॅकिंग फोर्स घटनास्थळी दाखल झाला. उत्तरीय तपासणीनंतर अरुणा यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.पोलिसांसमोर आव्हानघटनेचे गांभीर्य ओळखून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असली, तरी मारेकरांच्या शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनास्थळी आमदार उल्हास पाटील, जि. प.च्या सदस्या स्वाती सासने, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, पं. स.चे सदस्य मन्सूर मुल्लाणी यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या.बंगल्याची टेहळणीबाबूराव निकम यांच्या नातीच्या बारशानिमित्त वांगी येथे निकम कुटुंबीय गेले होते. त्यामुळे दिवसभर बंगल्याला कुलूप होते. दरोडेखोरांनी बंगल्याची टेहळणी करून रात्री दरोडा टाकला असावा, अशी चर्चा होती. मात्र, घरात लोक असतानाही मारेकरांनी निर्घृणपणे खून केला. खुनामागे आणखी काही कारण असावे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.छतालाही रक्ताचे डागझेबा श्वान बंगल्याभोवती व शिरोळ मार्गापर्यंत घुटमळले. दरम्यान, निद्रेत असलेल्या अरुणा यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर बंगल्याच्या छतालाही रक्ताचे डाग लागले होते. त्यामुळे मारेकºयांनी क्रूरपणे ही हत्या केल्याने उदगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.