शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक कुटुंबातील महिलांचा आदर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

विटा : महिलांना कायद्याचे मोठे संरक्षण असल्याने महिलांनी सबळ व्हावे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये. ज्या कुटुंबात स्त्रीचा ...

विटा : महिलांना कायद्याचे मोठे संरक्षण असल्याने महिलांनी सबळ व्हावे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये. ज्या कुटुंबात स्त्रीचा आदर केला जात नाही तेथे सर्व काही व्यर्थ आहे. त्यामुळे समाजासह प्रत्येक कुटुंबातील महिलांचा आदर व्हावा, अशी अपेक्षा विटा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

विटा येथे खानापूर तालुका विधि सेवा समिती व विटा वकील संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिरात न्या. कुलकर्णी बोलत होते. यावेळी दुसरे सह. दिवाणी न्यायाधीश जी. एस. हांगे, तिसरे सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग डी. एम. हिंग्लजकर, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी घोरपडे, उपाध्यक्षा अ‍ॅड. शौर्या पवार, सचिव अ‍ॅड. पी. एस. बागल, सहसचिव अ‍ॅड. पी. एस. माळी, सरकारी वकील अ‍ॅड. एम. आर. भांदुर्गे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. श्रीमती एस. बी. वेल्हाळ व अ‍ॅड. शबाना एम. मुल्ला यांनी महिलांसाठी तयारी केलेली कविता सादर केली. या शिबिरात वकील संघटनेच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. शौर्या पवार यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले, तर अ‍ॅड. ऋचा ग. जोशी यांनी महिलांचे घरगुती अत्याचारापासून संरक्षण अधिनियम याबाबत माहिती दिली. त्यानंतर अ‍ॅड. संतोष शिंदे यांनी लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिलांच्यासाठी 'पिढीता नुकसानभरपाई योजना व मनोधैर्या योजना' या शासनाच्या योजनांची माहिती दिली. अ‍ॅड. अबोली चं. पवार यांनी 'महिलांचा त्यांच्या कामाचे ठिकाणी होणारा लैंगिक छळ’ विरोधी कायद्याबाबत माहिती विशद केली.

विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी. घोरपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या शिबिरास पक्षकार, वकील, कर्मचारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोविड-१९ या साथ रोगाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून विटा येथील न्यायालयाच्या इमारतीच्या आवारात महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पाडण्यात आले.

फोटो - १८०३२०२१-विटा-महिला शिबिर : विटा येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला कायदेविषयक जनजागृती शिबिरात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी न्या. जी. एस. हांगे, न्या. डी. एम. हिंग्लजकर, अ‍ॅड. एस. जी. घोरपडे, अ‍ॅड. शौर्या पवार उपस्थित होते.