शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

'त्या' महिलेचा खून १0 हजारांसाठी

By admin | Updated: October 23, 2014 23:05 IST

अनैतिक संबंध : शेतमालकानेच काढला काटा; संशयितास अटक

सांगली : कासेगाव (ता. वाळवा) येथील अरुणा ठोंबरे या शेतमजूर महिलेच्या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या २४ तासात लावला. शेतमालक सुधाकर केरु शीद (वय ४८, रा. कासेगाव) यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला आज, गुरुवारी पहाटे अटक केली आहे. अरुणाशी माझे अनैतिक संबंध होते, ती नेहमी पैसे मागायची, दिवाळीसाठी दहा हजार रुपये द्यावेत, यासाठी तिने तगादा लावला होता. त्यामुळे तिचा खून केल्याची कबुली संशयित शीद याने दिली आहे.अरुणा ठोंबरे या शीद याच्या शेतात मजुरीचे काम करीत होत्या. शीदचे पाच एकर शेत आहे. शेतात जनावरांचा गोठा आहे. जनावरांना चारा टाकणे व गोठ्याची स्वच्छता करण्याचे काम त्या करीत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत काम करून त्या घरी जात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे शीद याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. शीदकडून त्या पैसेही घेत. गेल्या काही महिन्यांत अरुणा यांचे पैसे मागण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या दोघांत भांडण सुरू झाले होते. दिवाळीसाठी अरुणा यांनी त्याच्याकडे दहा हजाराची मागणी केली. शीदने २५ आॅक्टोबरला पैसे देतो, असे सांगितले. तोपर्यंत दिवाळी संपणार असल्याने अरुणा यांनी दोन दिवसांत पैसे पाहिजेत, असे सुनावले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यात पैशांवरून कडाक्याचे भांडण झाले. ‘उद्या (मंगळवार) मी कामाला येणार नाही’, असे सांगून त्या निघून गेल्या. मात्र, तरीही त्या मंगळवारी नेहमीप्रमाणे चार वर्षांच्या नातीला घेऊन कामावर आल्या होत्या. त्या कामावर आल्या आहेत का नाही, हे पाहण्यासाठी शीद दुपारी शेतात गेला होता. जनावरांच्या गोठ्याजवळ अरुणा यांची नात बसली होती. शीदने तिला आजी कुठे आहे, अशी विचारणा केली. तिने आजी वैरण आणण्यासाठी उसाच्या फडाकडे गेली असल्याचे सांगितले. तो तातडीने तिकडे गेला. त्यांच्यात तेथे पुन्हा पैशांवरून खडाजंगी झाली. यामुळे संतापलेल्या शीदने अरुणा यांचे डोके पाठीमागून धरून ते चिखलात दाबले. प्रतिकार करण्याची संधीही दिली नाही. अरुणा मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर तो तेथून निघून गेला. (प्रतिनिधी)तो मी नव्हेच...शीदने दिवाळीनिमित्त गावात फटाक्यांचा स्टॉल लावला आहे. खून केल्यानंतर तो घरी गेला. हात-पाय धुऊन, कपडे बदलून तो स्टॉलवर जाऊन बसला. रात्री आठ वाजले तरी अरुणा घरी गेल्या नव्हता. यामुळे त्यांचा मुलगा अमोल चौकशीसाठी शीदकडे गेला. शीदने त्याला, ‘शेतात उसाजवळ असेल की’, असे उत्तर दिले. ग्रामस्थ शोध घेण्यासाठी शेतात जात असताना तोही त्यांच्यासोबत गेला होता. त्यावेळी त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याचे कृत्य चव्हाट्यावर आले. नातीची मदत : सावंतजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले की, घटनेदिवशी शेतात अरुणा यांची नात हजर होती. शेतात कोण आले आणि कोण गेले, याची तिला माहिती होती. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली, त्यावेळी शीदशिवाय कोणीच येऊन गेले नसल्याचे समजले. तसेच त्याचे अरुणाशी संबंध असल्याची माहिती गावातून मिळाली होती. यामुळे त्याच्याकडे चौकशीचा ससेमिरा लावला. केवळ नातीमुळेच धागेदोरे हाती लागले. यामध्ये तिला साक्षीदार केले जाणार आहे.