शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सावळीमध्ये अपघातात महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्यावरील खडीवरून घसरल्याने महिला ...

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्यावरील खडीवरून घसरल्याने महिला रस्त्यावर पडली. या ट्रॅक्टरखाली सापडल्याने महिलाचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा नरेंद्र क्षीरसागर (वय ५५, रा. शिपूर, ता. मिरज) असे तिचे नाव असून, महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.

शिपूर येथील सुरेखा क्षीरसागर व नरेेंद्र विठोबा क्षीरसागर (५५) हे पती-पत्नी कवलापूर (ता. मिरज) येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. लग्नसमारंभ आटोपून मंगळवारी सायंकाळी ते मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० बीएल ५२६७) सावळीमार्गे शिपूरला जात होते, तर उसाने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच १० एस २४१) कुपवाडहून तानंगमार्गे जात होता. क्षीरसागर सावळी-तानंग रस्त्यावर आले असता, त्यांनी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्यावर पडलेल्या खडीवरून त्यांची मोटारसायकल घसरली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या सुरेखा रस्त्यावर पडल्या व ट्रॅक्टरखाली सापडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नरेंद्र क्षीरसागर गंभीर जखमी झाले.

कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित आयुष हेल्पलाईन टीमला पाचारण करून अपघातील पती-पत्नीला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु सुरेखा यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.