जत : तिकोटा (जि. विजयपूर) येथे कर्नाटक पोलिसांनी दादू लालू काळे (वय ४०, रा. सोरडी, ता. जत) यांना चौकशीसाठी बोलावून एका संशयिताला ताब्यात देण्यासाठी खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन छाया दादू काळे यांनी सांगली जिल्हा पोलीसप्रमुखांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, छाया काळे यांचे पती दादू काळे हे आई, दीर व मुलांसह एकत्र राहतात. कर्नाटकमधील तिकोटा पोलिसांनी एका प्रकरणाच्या चाैकशीसाठी दादू काळे यांना बोलावून घेतले होते. त्यांची दुचाकी काढून घेऊन संबंधित संशयिताला ताब्यात दे, अन्यथा तुलाही खोट्या गुन्ह्यात अडवितो, अशी धमकी दिली आहे.
याशिवाय २ मार्चपासून त्यांचा सतत धमकीचा फोन येत आहे. कर्नाटक पोलिसांकडून होणारा अन्याय थांबवावा, अन्यथा ८ मार्च रोजी जत पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे.