सांगली : आष्टा येथे दुचाकी आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. मनीषा राजकुमार चौगुले (वय ४५) असे त्यांचे नाव असून शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
सांगलीचा एकजण अपघातात जखमी
सांगली : पाचेगाव (ता. सांगोला) येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला. अमोल भाऊसाहेब गायकवाड (वय ४५, रा. नवीन वसाहत,सांगली) असे त्यांचे नाव असून शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
माळवाडीचा तरुण अपघातात जखमी
सांगली : माळवाडी (ता. पलूस) येथील तरुण अपघातात जखमी झाला. अकबर सिकंदर मुजावर (वय २५) असे जखमीचे नाव असून त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
कुपवाडचा तरुण अपघातात जखमी
सांगली : उल्हासनगर (कुपवाड) येथील तरुण अपघातात जखमी झाला. कुलदीप अशोक कदम (वय ३३) असे त्याचे नाव असून शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भारत सूतगिरणीजवळ हा अपघात झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
दुचाकी धडकेत मुलगी जखमी
सांगली : शहरातील गणेशनगरमध्ये दुचाकीच्या धडकेत मुलगी जखमी झाली. आराधना सिध्दू भोरे (वय १६) असे जखमीचे नाव असून शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
गव्हाणच्या वृध्देला विषबाधा
सांगली : गव्हाण (ता. तासगाव) येथील वृध्देला विषबाधा झाली. सरूबाई गणपती पाटील (वय ८५) असे त्यांचे नाव असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
नेर्ले येथे मुलास सर्पदंश
सांगली : नेर्ले (ता. वाळवा) येथील १३ वर्षीय मुलास सर्पदंश झाला. संचित दादासाहेब माने असे त्याचे नाव असून शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.