शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नदीत बुडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST

सांगली : शहरात कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाट परिसरात नदीत पडून महिलेचा मृत्यू झाला. रेखा पांडुरंग शिवरे (वय ४५, ...

सांगली : शहरात कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाट परिसरात नदीत पडून महिलेचा मृत्यू झाला. रेखा पांडुरंग शिवरे (वय ४५, रा. खणभाग, सांगली) असे मृत महिलेचे नाव असून, गुरूवारी रात्रीपासून त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. शुक्रवारी पहाटेच्यासुमारास नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर पहाटेच्यासुमारास पोहण्यासाठी गेलेल्यांना पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. काठावर कपडे, पर्स, पाण्याची बाटली असे साहित्य होते. याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह पूर्णपणे निर्वस्त्र असल्याने पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. काठावर सापडलेल्या पर्समध्ये केवळ डायरी आणि काही नाणी असल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी नदीकाठावरील नागरिकांना फोटो दाखवत तपास सुरू केल्यानंतर मृत रेखा यांच्या बहिणीमुळे मृतदेहाची ओळख पटली.

मृत रेखा खणभागातील धनगर गल्लीत राहण्यास होत्या. त्यांना एक मुलगी आहे. त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने त्या वारंवार घराबाहेर पडत होत्या. गुरुवारीही रात्री त्या बाहेर गेल्या होत्या. नदीकाठावर जाऊन आंघोळीसाठी त्या नदीत गेल्या असल्याची शक्यता असून, त्यांना पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.