शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजयाची माळ शेट्टी की मानेंच्या गळ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:27 IST

युनूस शेख लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : हातकणंगले लोकसभेच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ६९.४९ टक्केमतदान झाले. एकूण २ लाख ६९ ...

युनूस शेखलोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : हातकणंगले लोकसभेच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ६९.४९ टक्केमतदान झाले. एकूण २ लाख ६९ हजार २९५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार १४0 मतदारांनी हक्कबजावला. २0१४च्या निवडणुकीत ७२.५२ टक्केमतदान झाले होते.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीविरुद्ध रणशिंग फुंकले होते. २०१४ च्या निवडणुकीत शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बळावर विरोध मोडून काढत मतदारसंघातून २३ हजार ४४५ मताधिक्य घेतले होते. यावेळी शेट्टी यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांची ताकद होती. त्यामुळे मताधिक्यात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याविरोधात महायुतीकडून रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी भाजप-सेनेच्या पाच आमदारांची ताकद पणाला लागली होती. त्यामुळे येथे शेट्टींचे मताधिक्य रोखून धरण्याचा दावा युतीच्या समर्थकांकडून केला जात आहे.मतदानावेळी राजू शेट्टी यांच्यासाठी जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे कामाला लागले होते. त्यांच्या समूहातील कामगार प्रत्यक्ष मतदान बुथमध्ये सक्रिय होते, तर कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मतदारांची जुळणी करीत होते. माने यांच्यासाठीही भाजप-सेनेचे नेते, कार्यकर्त्यांसह मित्रपक्षांचे कार्यकर्ते कार्यरत होते.सगळ्यांचीच गोचीखासदार शेट्टी गेल्या दोन निवडणुकीत विकास आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढले. यावेळी त्यांनी काँग्रेस आघाडीशी घरोबा केल्याने, विकास आघाडीचे नेते त्यांच्यासमोर विरोधात ठाकले होते. धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने राष्ट्रवादीकडून लढल्या आहेत. आता माने कुटुंब शिवसेनेत गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याविरोधात आहेत. परिणामी, दोन्ही बाजूकडच्या सर्वांचीच गोची झाली होती.अंडर करंटची चर्चाहातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये शेट्टी-माने यांच्यातील लढतीचीच चर्चा रंगली. शेवटच्या दोन दिवसांत वंचित आघाडीची कपबशी, राजू शेट्टी नावाचे दोन उमेदवार, खासदारांनी काँग्रेस-आघाडीशी केलेली सलगी, शेट्टींनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचे उमटणारे पडसाद असे विषय समोर आले. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फक्त मोबाईल संदेशाची देवाण-घेवाण करून रान तापविल्याची चर्चा होती.