शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड ड्रेनेजवरून महासभेत वादळी चर्चा

By admin | Updated: April 20, 2016 23:46 IST

उपमहापौर गटाचा आक्षेप : महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यास केला विरोध

सांगली : कुपवाड शहराच्या प्रस्तावित ड्रेनेज योजनेतील आॅक्सिडेशन पाँडसाठी जागा निश्चिती व खरेदीचे अधिकार आयुक्तांना देण्याचा ठराव गत महासभेत करण्यात आला होता. या ठरावाला उपमहापौर गटाने आक्षेप घेतला. आयुक्तांना अधिकार न देता महासभेनेच जबाबदारी पार पाडावी, अशी भूमिका घेतली, तर कुपवाडच्या नगरसेवकांनी मात्र काँग्रेसमधील गटबाजीचा योजनेवर परिणाम होऊ नये असे सांगत, गतवेळी केलेल्या ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत इतिवृत्त मंजुरीवेळी कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी जागा निश्चितीचे अधिकार महापौरांना देण्यात आले होते. पण ठराव करताना हे अधिकार आयुक्तांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यावर नगरसेवक शेखर माने यांनी आक्षेप घेतला. सभागृहाने महापौरांना अधिकार दिले असताना आयुक्तांचा उल्लेख कसा काय आला? असा सवाल केला. महापौर हारूण शिकलगार म्हणाले की, मला अधिकार दिले असले तरी, शेवटी प्रशासनच त्याची अंमलबजावणी करणार आहे. आॅक्सिडेशन पाँडच्या जागेची निश्चिती जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासन करीत आहेत, असा खुलासा केला. राष्ट्रवादीचे विष्णू माने म्हणाले की, हा विषय गत सभेत अजेंड्यावर घेऊन मंजूर केला आहे. त्यावर विरोधाची चर्चा योग्य नाही. ड्रेनेज योजनेत काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण करू नका. ही योजना पूर्ण झाली नाही, तर कुपवाडची जनता कदापीही माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यावर शेखर माने यांनी, तुमचे आणि आयुक्तांचे काही ठरले असेल तर आमचा विरोध नाही, असा चिमटा काढला. स्थायी सभापती संतोष पाटील म्हणाले की, ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला अधिकार दिले असावेत. प्रशासनावर विश्वास असल्याने महापौरांच्या ठरावास पाठिंबा आहे. माजी उपमहापौर प्रशांत पाटील म्हणाले की, महाआघाडीच्या काळापासून कुपवाड ड्रेनेजची चर्चाच होत आहे. आता कुठे योजनेच्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. जीवन प्राधिकरणचा अभिप्राय घेऊन काही जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे महापौरांनी केलेला ठराव योग्यच आहे, असे मत त्यांनी मांडले. महापालिकेकडील ठेकेदारांची नोंदणी व त्यांच्या फीवाढीवर सभेत चर्चा झाली. विष्णू माने यांनी, ठेकेदार समन्स घेऊनही कामे करीत नाहीत. अशा ठेकेदारांवर कारवाईचा निर्णय घ्या, अशी मागणी केली. माजी महापौर विवेक कांबळे यांनी, ठेकेदारांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, ठेकेदारांनी आयकरासह इतर कर चुकविले आहेत. महापालिकेकडे एकाच ठेकेदाराने दोनदा नोंदणी केली आहे. या नोंदणीत बोगसगिरी असल्याचा आरोप त्यांनी केला. गटनेते किशोर जामदार म्हणाले की, २००७ पासून ठेकेदारांच्या नोंदणी फीमध्ये वाढ झालेली नाही. प्रशासनाने फी वाढीचे विषयपत्रच आणलेले नाही. याला कोण जबाबदार? समन्स घेऊनही दोन कामे प्रलंबित असतील, तर त्याची नोंदणी करू नये, असे मत त्यांनी मांडले. सदस्यांच्या सूचना व फी वाढीसह हा विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)कोट्यवधी रुपयांची जागा पडूननगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी, आरवाडे पार्कमधील कोट्यवधी रुपयांची जागा महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या एका वर्षापासून ही जागा ताब्यात घ्यावी, म्हणून आपण पाठपुरावा करतो. पण मालमत्ता विभागाकडे काहीच कागदपत्रे नसल्याने ही जागा ताब्यात घेतलेली नाही. या जागेची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. हवी असतील तर ती मी देतो. पण कोट्यवधी रुपयांची ही जागा कुणाच्या तरी घश्यात जाण्यापूर्वी ताब्यात घ्या, अशी विनंती त्यांनी केली. यावर महापौरांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.