शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

जतमध्ये पवनचक्क्या सील

By admin | Updated: April 5, 2015 00:05 IST

७७ लाखांचा दंड : विनापरवाना मुरुम उत्खनन; २६ वाहने जप्त

जत : तालुक्यातील कोळगिरी व उमराणी परिसरात विनापरवाना वीस हजार ब्रास मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी घमेशा विंड व सुझलॉन या दोन पवनऊर्जा निर्माण कंपन्यांची ट्रॅक्टर, जेसीबी आदी सव्वीस वाहने जप्त करून त्यांना ७७ लाखाच्या दंडाची नोटीस शनिवारी बजावण्यात आली. त्यांच्या पवनचक्क्याही सील करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पवनऊर्जा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. तालुक्यातील पवनऊर्जा निर्माण कंपन्या रस्ते व इतर कामांसाठी शासनाकडून घेतलेल्या परवान्यापेक्षा जादा मुरुम उत्खनन करून महसूल बुडवत आहेत. शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करून त्यांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करत आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी ही कारवाई केली. घमेशा विंड या पवनऊर्जा निर्माण कंपनीने कोळगिरी परिसरातील दीड किलोमीटर लांबीचा रस्ता केला आहे. त्यासाठी त्यांनी दोनशे ब्रास मुरुम उत्खनन करण्याचा परवाना घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात १९००० ब्रास मुरुम उत्खनन केले आहे. यासंदर्भात त्यांना ६४ लाख ६० हजार २५० रुपये दंडाची नोटीस देऊन त्यांची चौदा वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर पवनऊर्जा युनिट सील करण्यात आले आहे. सुझलॉन कंपनीने उमराणी (ता. जत) परिसरात ३७० ब्रास विनापरवाना मुरुम उत्खनन केले आहे. त्यांना १२ लाख ५८ हजार २५० रुपये दंडाची नोटीस देण्यास आली आहे. त्यांची विविध प्रकारची बारा वाहने जप्त करण्यात आली आहेत. रिनिव्हल टर्बाईन या पवनऊर्जा निर्माण कंपनीने निगडी खुर्द (ता. जत) परिसरात ३३ युनिट उभे केले आहेत. त्यासाठी त्यांनी एन ए परवाना घेतला नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. प्रकाश कन्स्ट्रक्शनने जत ते देवनाळ रस्त्यावर काँक्रिट मिक्सिंग प्लँट उभा केला आहे. त्यासाठी वाळू, खडी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे, परंतु त्याचा परवाना घेण्यात आला नाही. व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू असल्याने प्लँट सील करून ३ लाख ७४ हजार ८७५ रुपये दंडाची नोटीस देण्यात आली आहे. (वार्ताहर)