फोटो- कुंडल (ता. पलूस) येथे आ. अरुण लाड यांना संदीप सावंत, राकेश तिरमारे, अशोक पवार, उत्तम सुपने, प्रकाश पवार, किरण नलवडे, महादेव जाधव, हणमंत घाडगे यांनी निवेदन दिले.
दुधोंडी : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत आला आहे. पुढील बैठकीवेळी यावर आपला प्रतिनिधी या नात्याने पेन्शन देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आमदार अरुण लाड यांनी सांगितले.
एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित-विनाअनुदानित व लगेच शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांच्या जुन्या पेन्शनसंदर्भात संघटनांतर्फे कुंडल (ता. पलूस) येथे आमदार अरुण लाड यांना निवेदन दिले.
अरुण लाड म्हणाले की, जुनी पेन्शन योजनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा विषय चर्चेत आला आहे. बैठकीवेळी यावर बाजू मांडून पेन्शन देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीचे सहसचिव संदीप सावंत, सांगली जिल्हा पेन्शन कोअर कमिटी राकेश तिरमारे, प्रकाश पवार, साबीर शिकलगार, महेशकुमार अवसरे, अप्पासाहेब घाडगे, उत्तम सुपने, महादेव जाधव, किरण नलवडे, श्रीमंत शिंदे, सचिन काळेबाग, मोहन जाधव उपस्थित होते.