शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्प होणार की बारगळणार?

By admin | Updated: November 20, 2015 00:18 IST

निसर्गप्रेमींचा सवाल : प्रकल्पाची अधिसूचना निघाली, मात्र निधीच नाही

येळापूर : देशातल्या ३९ व्या व्याघ्र प्रकल्पाची आणि पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना निघाली, मात्र या सर्वांसाठी लागणाऱ्या निधीसाठी राज्य व केंद्र सरकारचा निधी कधी मिळणार, याकडे नजरा लागल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प होणार की बारगळणार, हे सरकार निर्णयाने ठरणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सत्तेत असताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना जारी केली. याचा केंद्र व राज्यातील सरकारने पाठपुरावा केला. चांदोली अभयारण्याची व्याघ्र प्रकल्प उभारणीसाठी व निसर्ग पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने २00३ मध्ये घोषणा करण्यात आली. दुर्मिळ व वैविध्यपूर्ण वनसंपदेचे वरदान चांदोली अभयारण्याला लाभले आहे. चांदोली अभयारण्य क्षेत्र सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विस्तारले असल्याने त्याचे महत्त्वही वाढले आहे.राज्याच्या अधिसूचनेनुसार कोयना व चांदोली धरण कार्यक्षेत्रातील अभयारण्यामध्ये ७१४.२२ चौरस कि.मी. क्षेत्रात या व्याघ्र प्रकल्पाची उभारणी होणार होती. यामध्ये चांदोलीच्या ३१७.६४ चौरस कि.मी., तर कोयनेच्या ४२३.५५ चौरस कि.मी. क्षेत्रामध्ये हा प्रकल्प विस्तारला जाणार होता. मात्र या अभयारण्यातील वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, बिबट्यासह इतर प्राण्यांची संख्या तुलनेने जास्त आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली, कोयना व राधानगरी मिळून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास १८ हजार ७४५ हेक्टर एवढ्या क्षेत्रातील शिराळा तालुक्यातील १९, पाटण तालुक्यातील ८, शाहुवाडी तालुक्यातील ९, तर संगमेश्वर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. आतापर्यंत साडेनऊ कोटी रुपये यासाठी खर्च झाला असून आणखी कोट्यवधी रुपयांची गरज आहे. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने वाघ्र प्रकल्पाची घोषणा केली. पण निधी मात्र दिलाच नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात सापडले आहे. (वार्ताहर)