शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात पालिकेचे शिवधनुष्य सेना पेलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST

फोटो : २४अविनाश पाटील, २४अमोल काळे, २४संजय चव्हाण दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा पल्ला लांब असला तरी ...

फोटो : २४अविनाश पाटील, २४अमोल काळे, २४संजय चव्हाण

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा पल्ला लांब असला तरी पालिकेचे शिखर सर करण्यासाठी जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शहरात आजवर अदखलपात्र असणारी शिवसेना माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पक्षप्रवेशाने दखलपात्र झाली आहे. मात्र, तासगाव नगरपालिका निवडणुकीचे शिवधनुष्य शिवसेना पेलणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

तासगाव शहरात आबा गट विरूध्द काका गट अशा पारंपरिक गटातच बहुतांश पालिका निवडणुका झाल्या. नेत्यांचा पक्ष बदल झाला, तरी पक्षापेक्षा नेता हा पक्ष माणून कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवल्या. त्यामुळेच गतवेळच्या निवडणुकीत पालिकेत भाजपचा झेंडा फडकला. पालिकेच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील नेत्यांना टक्कर देत काँग्रेसनेही स्वत:चे उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. मात्र, शहरात शिवसेनेचे आजपर्यंत अस्तित्व निवेदन आणि आंदोलनापुरतेच मर्यादीत राहिले होते. तालुकाप्रमुुख अमोल काळे आणि शहरप्रमुख संजय चव्हाण यांनी शहरात आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्याचे काम केले. मात्र, तरीही पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना अदखलपात्र राहिली.

काही दिवसांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी भाजपशी फारकत घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. तासगावच्या राजकारणात खासदारांसाठी रणनिती तयार करण्यासाठी एकेकाळी पुढाकार घेणारे पाटील आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. अविनाश पाटील यांचे स्वत:च्या प्रभागात वर्चस्व आहे. त्यांंचे भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांशीही चांगले नेटवर्क आहे. या नेटवर्कचा फायदा करून भाजपमधील ताकदीचे नाराज कितपत गळाला लावणार, यावर सेनेचे शहरातील दखलपात्र भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने शहरात दखलपात्र झालेली शिवसेना पालिकेच्या रणांगणात शिवधनुष्य पेलणार का? याचे औत्सुक्य आहे.

चौकट :

सेना, काँग्रेसमध्ये खलबतांची चर्चा

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. तशीच महाविकास आघाडी पालिकेच्या निवडणुकीत होईल, अशी चर्चा आहे. मात्र, या महाविकास आघाडीचे भवितव्य जागावाटपावर अवलंबून आहे. या घडामोडींना अद्याप अवधी असला तरी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसच्या स्थानिक कारभाऱ्यांमध्ये खलबते झाल्याची चर्चा आहे.