शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
5
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
6
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
7
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
8
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
9
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
11
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
12
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
13
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
14
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
15
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
16
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
17
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
18
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
19
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
20
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

पैसे मिळाल्याशिवाय आरटीईसाठी नोंदणी करणार नाही, खासगी इंग्रजी शाळांची भूमिका 

By संतोष भिसे | Updated: February 6, 2023 17:03 IST

शाळांचे शुल्क बुडविण्याची प्रथा

सांगली : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाचे पैसे मिळाल्याशिवाय आरटीई योजनेसाठी नोंदणी करणार नाही अशी भूमिका खासगी इंग्रजी शाळांनी घेतली आहे. संस्थाचालकांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेण्यात आली.जिल्ह्यात आरटीईनुसार नोंदणीसाठी २३४ इंग्रजी शाळा पात्र आहेत. सर्व शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. यासंदर्भात शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी नोंदणी केली नाही तर कारवाई करु, शाळांच्या नोंदणी रद्दसाठी प्रस्ताव पाठवू असा इशारा दिला आहे. त्यावर विचार करण्यासाठी झालेल्या बैठकीला ३५ शाळांचे संस्थाचालक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आवाहन केले की, शाळांनी पैसे मिळेपर्यंत नोंदणी करु नये. परताव्यापोटी शासनाकडे ३० कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी फक्त ८५ लाख रुपये दिले आहेत. आरटीईसाठी नोंदणी करण्याची शाळांची तयारी आहे, पण त्यासाठी कॅम्प घेण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून झालेली नाही. नाहरकत प्रमाणपत्रासाठी सीबीएसई आणि आयसीएससी शाळांचे प्रस्ताव मागविले, त्यासाठी प्रत्येक शाळेकडून १ लाख ५० हजार रुपये शुल्क भरून घेतले. त्याच्याही फायली प्रलंबित आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकारी गायकवाड यांना भेटून निवेदन देण्यासाठी सर्व संस्थाचालक गेले होते, मात्र ते भेटले नाहीत. बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे सर्व शाळांमधील आरटीई लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन जिल्हा परिषदेत जाण्याचा निर्णय बैठकीत झाला. तेथे मेळावा घेण्यात येणार आहे. शाळांचे शुल्क बुडविण्याची प्रथापालकांकडे शुल्क प्रलंबित राहिले, तर शाळा त्यांचे दाखले अडवितात. ते देण्यासाठी जिल्हा परिषद आणि अधिकाऱ्यांकडून दबावतंत्र वापरले जाते. पालकांना परस्पर दाखले दिले जातात. त्यामुळे शाळांना शुल्कावर पाणी सोडावे लागले आहे. शाळांची फी बुडविण्याची प्रथा सुरु झाली आहे असा दावा बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा