शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

नेवरी औट-पोस्टला इमारत मिळेल का?

By admin | Updated: July 20, 2014 23:41 IST

ग्रामस्थांचा सवाल : पोलीसप्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणी

गणेश पवार - नेवरी नेवरी (ता. कडेगाव) येथील येरळा काठावरील सर्वच गावांसाठी सोयीकरिता नेवरी येथे पोलीस औट-पोस्ट सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्या अनुषंगाने माजी जिल्हा पोलीसप्रमुख कृष्ण प्रकाश यांनी येरळा काठावरील चोरीचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता व लोकांची कामे जागीच पूर्ण व्हावीत, यासाठी पोलीस औट-पोस्ट सुरू करण्यात आले; मात्र पोलीस औट-पोस्टसाठी इमारत होणार की नाही, याबाबत ग्रामस्थांतून साशंकता व्यक्त केली जात आहे. याकरिता जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.नेवरी (ता. कडेगाव) येथे येरळा काठावरील अकरा ते बारा छोट्या-मोठ्या गावांचे कामकाज नेवरी पोलीस औट-पोस्टला चालते. याठिकाणी जे. व्ही. निकम, विवेक शिंदे आदींसह पाच पोलीस लोकांचा स्टाफ उपलब्ध आहे. याठिकाणी २३ जुलै २०११ पासून हे काम सुरळीत सुरू आहे. गावच्या शाळेमध्ये जुन्या शाळेमध्ये दोन खोल्या भाड्याने घेऊन हे औट-पोस्ट सुरू आहे. संबंधित ग्रामस्थांनी पोलीस औट-पोस्टसाठी इमारत व्हावी, याकरिता जिल्हा पोलीस मुख्यालय यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे पूर्ण करून पाठपुरावा केला आहे; मात्र नेवरी पोलीस औट-पोस्टच्या इमारतीकडे संबंधित खाते सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे.याबाबत नुकत्याच पार पडलेल्या गणपती उत्सव शांतता ग्रामपंचायत बैठकीत ग्रामस्थांनी पोलीस औट-पोस्ट इमारत व्हावी, अशी मागणी सध्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायतीने मागणीनुसार पोलीस मुख्यालयाकडे जागाही देऊ केली आहे. प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे जागा देऊनही अद्याप कोणताही निधी, पाऊल उचलले नसल्याने ग्रामास्थांत इमारत कधी होणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नेवरी पोलीस औट-पोस्ट इमारतीसाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी विशेष खास बाब म्हणून लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.