शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त लिपिकांवरील अन्याय दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

तासगाव : एसटी महामंडळाच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर विभागातील काही लिपिकांना अतिरिक्त ठरवून विभागाबाहेर बदली आणि सेवा खंडितची कारवाई ...

तासगाव : एसटी महामंडळाच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर विभागातील काही लिपिकांना अतिरिक्त ठरवून विभागाबाहेर बदली आणि सेवा खंडितची कारवाई केली आहे. या लिपिकांवरील अन्याय लवकरच दूर करू, असे आश्‍वासन परिवनहमंत्री अनिल परब यांनी दिले.

एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तिन्ही जिल्ह्यांतील अन्यायग्रस्त लिपिकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांना निवेदन देत, अतिरिक्त ठरवलेल्या लिपिकांना तातडीने मूळ ठिकाणी रुजू करून घेण्याची मागणी केली.

एसटी महामंडळाच्या अतिरिक्त लिपिकांच्या प्रश्‍नासंदर्भात एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि अतिरिक्त लिपिकांनी मुंबई येथे परिवहन मंत्र्यांची भेट घेतली. सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी, सांगली, सातारा व कोल्हापूर वगळता इतर कोणत्याही विभागात असा प्रकार घडलेला नसताना, फक्त या तीनच विभागांमध्ये हा प्रकार घडल्याचे व ऐन कोरोना संसर्ग राज्यात थैमान घालत होता, त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यामुळे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना या तीन विभागांमध्ये घडल्याचे परिवहनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन लवकरच न्याय देण्याचे यावेळी परिवहनमंत्र्यांनी मान्य केले.

यावेळी राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उत्तेकर, स्मिता पत्की, रवींद्र चिपळूण, प्रमोद मिस्त्री, सुहास जंगम यांच्यासह अन्यायग्रस्त कर्मचारी उपस्थित होते.

फोटो-२५तासगाव१

फोटो :

सांगली, सातारा, कोल्हापूर विभागातील अन्यायग्रस्त लिपिकांना मूळ ठिकाणी सेवेत घेण्याबाबत परिवनहमंत्री अनिल परब यांना मुंंबई येथे शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर, नारायण उत्तेकर, स्मिता पत्की, रवींद्र चिपळूण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.