शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉल्बी’ला दणका खरंच बसणार का?

By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST

पोलीस आक्रमक : दोन वर्षानंतर कायद्यावर बोट

सांगली : गणेश विसर्जनाच्या पाचव्यादिवशी ‘डॉल्बी’चा दणदणाट सुरू ठेवणाऱ्या पाच मंडळांच्या अध्यक्ष, पदाधिकारी व डॉल्बी मालकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी डॉल्बीविरोधी असलेली त्यांची भूमिका न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आक्रमक असल्याचे दाखविले आहे. गेल्या दोन वर्षांत यावर्षी प्रथमच डॉल्बीचा दणदणाट सुरू ठेवल्याने गुन्हे दाखल झाले आहेत.डॉल्बीच्या दणदणाटाने नागरिकांच्या विशेषत: आजारी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आवाज सहन न झाल्याने लोकांचा बळी गेलेल्या घटनाही घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी पोलीसप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप सावंत यांनी ‘नो डॉल्बी’चा इशारा दिला होता. त्याचा परिणाम चांगला झाला. एकाही मंडळाने डॉल्बी लावण्याचे धाडस केले नाही. गतवर्षीही मंडळांनी डॉल्बी लावण्याचे धाडस केले नाही. ‘नो डॉल्बी’साठी पोलिसांनी दोन वर्षे फार मेहनत घ्यावी लागली; मात्र यावर्षी पोलिसांकडून ‘नो डॉल्बी’साठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. एक-दोनवेळा मंडळाची बैठक घेऊन डॉल्बी लावू नका, असे आवाहन केले. याला काही मंडळांनी प्रतिसाद दिला, तर काहींनी पोलिसांना न जुमानता मोठ्या सुपाऱ्या देऊन डॉल्बी बुक केले आहेत. त्याचाच एक भाग पाचव्यादिवशी पाच मंडळांनी मिरवणुकीत बेभान होऊन डॉल्बीचा आवाज सोडला. यामुळे पोलिसांना कायद्यावर बोट ठेवून गुन्हे दाखल करावे लागले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप सावंत म्हणाले, डॉल्बी लावू नका, असे आवाहन यापूर्वी केले आहे. यामुळे पोलीस गप्प बसणार नाहीत. डॉल्बीचा दणदणाट सुरू ठेवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे दाखल करून गप्प बसणार नाही. त्याचा तपास करून शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)शिक्षेची तरतूद ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियम २००० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार डॉल्बीचालक व मंडळांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्यांतर्गत न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास पाच वर्षांचा कारावास व लाख रुपये दंड, अशी शिक्षेची तरतूद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली. ध्वनी तीव्रतेची प्रिंटगणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लावलेल्या डॉल्बीच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. हे पथक ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करते. त्यानंतर त्याची प्रिंट करून संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे दाखवून देते. पुढे याच प्रिंटच्या पुराव्याआधारे गुन्हा दाखल केला जातो, तसेच न्यायालयातही सादर केला जातो.