तासगाव : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमोल कदम यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळणे अपेक्षित होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट झाले. या निर्णयामुळे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या अनेक तरुणांचे आणि येणाऱ्या पिढीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत संभाजी ब्रिगेड आंदोलन करीत राहील. लवकरच आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा ब्रिगेडचे अध्यक्ष कदम यांनी दिला.