शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावजवळ अपघातात पती ठार, पत्नी गंभीर

By admin | Updated: February 24, 2016 00:43 IST

टेम्पोची दुचाकीस धडक : दाम्पत्य कवठेमहांकाळचे; जमावाकडून टेम्पोची तोडफोड

कवठेमहांकाळ/देशिंग/शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण-बोरगाव येथील नंदिवाले वस्तीजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दादासाहेब जयवंत भोसले (वय ५०, रा. आश्रमशाळेजवळ, कवठेमहांकाळ) जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी वंदना (४५) गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.दादासाहेब भोसले व पत्नी वंदना यांच्यासह सकाळी कवठेमहांकाळ येथून शिरढोण-बोरगाव रस्त्यावरून देवदर्शनासाठी पद्माळेकडे (ता. मिरज) निघाले होते. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील फाट्यावरून ते बोरगावच्या दिशेने काही अंतर पुढे आले असता, शिरढोणच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या टेम्पोने (क्र. केए ४९ : ३६७०) समोरील ट्रकच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात, समोरून येणाऱ्या भोसले यांच्या दुचाकीस (क्र. जेएच ०१ बीजी ०६७५) जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे रक्तस्राव होऊन भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी वंदना गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका जोरात होता की, भोसले यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोचालकाने पलायन केले. अपघातानंतर जवळच शेतात मजुरी करीत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी टेम्पोची तोडफोड केली. हा टेम्पो द्राक्ष वाहतूक करीत असल्याचे समजते. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून, एल. एम जाधव अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)