शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कवलापुरात पत्नी-मुलीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:19 IST

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे किरकोळ वादातून संशयित बंडोजी महादेव पाटील (वय ४२, रसूलवाडी रस्ता, कवलापूर) याने पत्नी ...

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे किरकोळ वादातून संशयित बंडोजी महादेव पाटील (वय ४२, रसूलवाडी रस्ता, कवलापूर) याने पत्नी लीला (३७) आणि मुलगी वैष्णवी या दोघींना कुदळीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी लीला पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंडोजी याने चार दिवसांपूर्वी मुलगी वैष्णवी हिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. तो लीला यांनी परत मागितला. त्यामुळे बंडोजीला राग आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. यावेळी मुलगी वैष्णवी आईला सोडवण्यास धावली. बंडोजी याने कुदळीचा दांडा काढून पत्नी व मुलगी या दोघींनाही मारहाण केली. दोघींच्या पाठीत व कंबरेत दांड्याने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

--------------------

सांगलीत एकास शिवीगाळ व मारहाण

सांगली : विश्रामबाग लिमये मळ्यात स्वप्नपूर्ती अपार्टमेंट या सदनिकेच्या बैठकीत विश्वनाथ प्रभूदेसाई यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी पवार (पूर्ण नाव नाही) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पूजा विश्वनाथ प्रभूदेसाई यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नपूर्ती अपार्टमेंटच्या टेरेसवर आयाेजित बैठकीत फ्लॅट नं. ६ मधील पवार नामक संशयित तेथे आला. त्यांनी विश्वनाथ प्रभूदेसाई यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच मारहाण करून जखमी केले. इतरांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. त्यानंतर पूजा प्रभूदेसाई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

------------------

वखारभागात तीन दुकाने फोडलीे

सांगली : येथील वखारभाग परिसरात रात्रीत तीन दुकाने फोडल्याचा प्रकार घडला. रोख रक्‍कम, चांदीची नाणी व शेंगतेलाचा डबा असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या तिन्ही चोऱ्यांबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. अभिजित आदगोंडा पाटील (३३) यांचे वखारभागात हुतात्मा बँकेजवळ आदिनाथ ट्रेडर्स दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून रोख ३५०० रुपये व चार चांदीची नाणी असा ३ हजार ९०० रुपयाचा ऐवज पळवला. परिसरातील सुरेश आण्णासाहेब पाटील (वय ७१) यांचे नेमिनाथ ट्रेडिंग कंपनी हे दुकान फोडून रोख ८५० रुपये व शेंगतेलाचा डबा असा ३३५० रुपयाचा मुद्देमाल लांबवला. तसेच जैनबस्तीजवळील विलास चतुरलाल शहा (वय ७२) यांच्या शहा पाटील ॲन्ड कंपनी या दुकानाचा कडी-कोयंडा उचकटून रोख ४५०० रुपये आणि गोदामाच्या दोन किल्ल्या, कागदपत्रे लांबवली. सकाळी सहाच्यासुमारास चोऱ्या झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिन्ही दुकानाच्या मालकांनी शहर ठाण्यात फिर्याद दिली.

------------------

नावरसवाडीत अपघातप्रकरणी गुन्हा

सांगली : नावरसवाडी (ता. मिरज) येथे भरधाव वेगाने मोटार चालवून रिक्षाचालकास जखमी केल्याप्रकरणी मोटारचालक विवेक उत्तम चव्हाण (रा. सांगली) याच्याविराेधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी रिक्षाचालक अमोल अण्णासाहेब पवार (वय ४४, खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पवार आणि त्यांचा मित्र अजय हे दोघेजण रिक्षामधून (क्र. एमएच १० सीक्यू ११८८) नांद्रे येथे शेंगदाणे बी आणण्यासाठी गेले हाेते. बियाणे घेऊन परत येत असताना नावरसवाडी फाट्याजवळ सोनपरी हॉटेलसमोर मोटारीने (क्र. एमएच १० बीझेड २१२४) रिक्षाला धडक दिली. धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. तसेच रिक्षा व मोटारीचे नुकसान झाले. जखमी पवार यांनी मोटारचालक चव्हाण याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.