शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विट्याचा साक्षीदार जमीनदोस्त

By admin | Updated: October 15, 2016 23:27 IST

शेकडो वर्षांचा बुरूज पाडण्याची प्रक्रिया : अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा

दिलीप मोहिते ल्ल विटा जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या टोलेजंग स्मारकासाठी या बुरूजाची जागा मोकळी करण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे इसवी सन १८०० पूर्वीच्या या ऐतिहासिक बुरूजाच्या पाऊलखुणा नष्ट होणार आहेत. विटा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात मराठी राज्यावर अनेक राजे झाले. या काळात त्र्यंबक कृष्ण देशपांडे यांच्याकडे विटा भाळवणीचे ‘देशपांडेपण’ होते. त्याच काळात विटा येथे त्र्यंबकरावांनी ऐतिहासिक काळाची साक्ष देणारा वाडा, तट व बुरूज बांधल्याचे सांगितले जाते. सध्या वाडा, तट नाहीसा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकातून दक्षिणेकडे अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या बुरूजाचा ताबा ब्रिटिशांकडेही होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या ऐतिहासिक बुरूजाची मालकी सरकारकडे गेली. त्यामुळे हा बुरूज सरकारकडेच होता. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक याच बुरूजाच्या जागेवर व्हावे, अशी मागणी आण्णा भाऊ साठे स्मारक समितीने तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील व विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी अण्णा भाऊप्रेमींनीही या जागेवरच स्मारक करावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, ही जागा सरकारच्या ताब्यात असल्याने रितसर प्रस्ताव सादर करून बुरूजाची जागा विटा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी राज्य शासनाला या जागेची रितसर किंमत भरून ऐतिहासिक बुरूज असलेली सर्व म्हणजेच ३०० चौ. मी. (तीन गुंठे) जागा नगरपरिषदेच्या मालकी हक्काची करण्यात आली. त्यामुळे या जागेवर आता साहित्यरत्न अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विटा शहराची शेकडो वर्षांपासून साक्ष देणारा हा ऐतिहासिक बुरूज पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दगडी बांधकाम व त्यावर पांढऱ्या मातीचा साठा असलेला हा भलामोठा बुरूज पाडण्यासाठी तीन ते चार दिवसांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. विटा शहरातील शेकडो वर्षाच्या ऐतिहासिक काळाचा साक्षीदार असलेला हा बुरूज जमीनदोस्त होत असताना पाहण्यासाठी विटेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. टोलेजंग स्मारक उभारणार : वैभव पाटील ऐतिहासिक बुरूजाच्या जागेवर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी होती. राज्य शासनाला या जागेसाठी रितसर रक्कम भरून ही जागा नगरपरिषदेच्या मालकीची करण्यात आली आहे. हा बुरूज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच या जागेवर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचे टोलेजंग स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.