शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्याच्या कर्जाचा बाऊ कशाला?

By admin | Updated: April 18, 2016 00:23 IST

दिलीपतात्या पाटील : थकबाकी भरल्यानेच ते कर्जासाठी म्हणून पात्र

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या यापूर्वीच्या कर्जाची सर्व थकित रक्कम भरली आहे. कर्ज भरणारा प्रत्येक कर्जदार हा पुढील कर्जासाठी पात्र ठरत असतो. त्यामुळे वसंतदादा साखर कारखान्याच्या नव्या कर्जमंजुरीचा बाऊ कशाला?, असा सवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी रविवारी उपस्थित केला. ते म्हणाले की, बँकेने सध्या बँकिंग धोरणांचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात झाली आहे. नवे वित्तीय वर्ष सुरू झाल्याने बँकेकडील पैशातून व्याज स्वरुपात उत्पन्न सुरू करण्यासाठी नव्या कर्ज प्रकरणांच्या मंजुरीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एखादा शेतकरी जेव्हा त्याचे कर्ज व थकबाकी भरतो, तेव्हा तो नव्या कर्जासाठी पात्र होतो. बँकिंग क्षेत्राचा हा नियमच आहे. त्याचपद्धतीने एखादी अकृषिक संस्था त्यांचे खाते नियमित करीत असेल, तर त्यांना कर्जपुरवठा केलाच पाहिजे. वसंतदादा कारखान्याने यावेळी त्यांची सर्व थकबाकी भरलेली आहे. कारखाना थकबाकीत असता, तर त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर होऊ शकले नसते. यापूर्वी ज्यावेळी कारखान्याचे खाते एनपीएमध्ये होते, त्यावेळी त्यांनी दिलेल्या कर्जप्रस्तावास आम्ही नकार दर्शविला होता. आता त्यांचे खाते नियमित झाल्याने नव्या कर्जासाठी ते पात्र ठरलेले आहे. कारखान्याला दिलेल्या नव्या कर्जातून पुन्हा व्याजस्वरुपात उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे यात बँकेचाच फायदा आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा कारखाना असून त्यावर अनेक कामगारांचे जीवनही अवलंबून आहे. अशा मोठ्या संस्थेचे तसेच मोठा कर्जदार म्हणून त्यांचे हित पाहिल्यास, साहजिकच बँकेचाही त्यात फायदा आहे. त्यामुळे या कर्जप्रकरणाचा एवढा बाऊ करण्यात अर्थ नाही. बँकिंगच्या कारभाराचा हा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)