शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळचे बंड कोणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: February 15, 2017 23:30 IST

लक्षवेधी लढती : राष्ट्रवादी-स्वाभिमानी आघाडी व भाजप-काँग्रेस यांच्या विकास आघाडीतच सामना

लखन घोरपडे ल्ल देशिंगकवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नाराजांनी बंडखोरी करून आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गट व गणांत बंडोबांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा सुरू आहे.तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात सहा उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यापैकी कुची गटात तीन उमेदवार, ढालगाव गटात दोन, तर देशिंग गटात एक अपक्ष उमेदवार आहे. यातील बहुतेकजण राष्ट्रवादीचे आहेत. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीच्याच उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. केवळ रांजणी गटात भाजप व काँग्रेसप्रणित विकास आघाडी, स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना व शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवार असून इतर तीनही गटात बंडखोरांचे आव्हान आहे.जि. प. व पं. स.साठी तालुक्यात काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. परंतु सर्वसाधारण लढती राष्ट्रवादीप्रणित स्वाभिमानी विकास आघाडी विरूध्द भाजप व काँग्रेसप्रणित विकास आघाडीतच होणार आहेत. काही ठिकाणी भाजप आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांनी स्वाभिमानी विकास आघाडीला आव्हान दिले आहे. सर्वाधिक बंडखोरी राष्ट्रवादीमध्ये असून, ढालगाव गटात राष्ट्रवादीचेच अर्जुन कर्पे यांनी आघाडीच्या उमेदवाराला आव्हान दिले. कुची गटातही दोन अपक्ष, तर देशिंग गटात राष्ट्रवादीच्याच सुरेखा कोळेकर यांनी स्वाभिमानी विकासच्या उमेदवाराविरूध्द रणशिंग फुंकले आहे. पंचायत समितीसाठीही अपक्षांनी बाणा कायम राखला असून आठ गणांसाठी सहा अपक्ष रिंगणात आहेत. कुची गणात दोन अपक्षांनी स्वाभिमानी व विकास आघाडीच्या विरोधात बंड केले आहे. याशिवाय स्वाभिमानी पक्षामुळे येथे पंचरंगी लढत आहे. कोकळे गणात सहा उमेदवार आहेत. मळणगाव गणात स्वाभिमानी विकास आघाडी व विकास आघाडी यांच्यातच दुरंगी सामना होत आहे. देशिंग गणात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नसल्याने, सुहास पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना विकास आघाडीने पुरस्कृत केले आहे, शिवाय रिपब्लिकन पार्टीनेही येथे उमेदवार दिला आहे. एक अपक्षही रिंगणात असल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. हिंगणगाव व रांजणी गणात मात्र थेट लढती होत आहेत.