शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

लॅण्डमाफियांना रोखणार कोण?

By admin | Updated: January 16, 2015 23:42 IST

फसलेले न्यायाच्या प्रतीक्षेत : यंत्रणेतील दोष दूर होण्याची गरज

सचिन लाड - सांगली - प्लॉट हडप करणाऱ्या टोळ्या ग्रामीण भागातही सक्रिय आहेत. देवस्थानच्या जमिनीही लाटण्याचे प्रकार सुरु आहेत. लॅण्डमाफिया आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे दिवसेंदिवस प्लॉट हडप करण्याचे प्रकार वाढत आहेत. तक्रार करुनही पोलीस आणि महसूलचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत. परिणामी फसगत झालेल्या लोकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आज ना उद्या न्याय मिळेल, या प्रतीक्षेत हे लोक वर्षानुवर्षे आहेत.महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातही प्लॉट हडप करणाऱ्या लॅण्डमाफियांच्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांच्या दहशतीला घाबरुन लोक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. तक्रार केली, तर पोलीस त्याची दखल घेत नाहीत. नगरभूमापन, तलाठी कार्यालयातील अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे अपील करण्याचा सल्ला देतात. शासकीय यंत्रणेत कोणताही समन्वय नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. गुंठेवारीतील प्लॉट खरेदी-विक्रीची नोंद होत नाही. केवळ नोंदणीकृत वकिलासमोर खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. (समाप्त)प्लॉट हडप करणाऱ्या टोळीशी महसूलच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. खरेदी-विक्रीची नोंद करण्यास तलाठी टाळाटाळ करतात. जी नियमावली आहे, त्याचे पालन केले जात नाही. परिणामी लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत.- राजू ऐवळे, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.प्लॉट हडप केलेल्या जुन्या तक्रारी असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल. नवीन तक्रारी आल्या, तर त्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पोलिसांची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे.- दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख प्रशासनाच्या त्रुटींचा लॅण्डमाफिया गैरफायदा घेत आहेत. फसगत लोकांना न्यायासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागत आहेत. ही प्रकरणे निकालात काढण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणेतील दोषही दूर होण्याची गरज अहे.- रोहित चिवटे, मिरज.प्लॉटच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या लोकांची शासन दरबारी दखल घेतली पाहिजे. पोलिसही फसवणुकीला बळी पडल्याने सर्वसामान्यांचे काय? प्लॉट खरेदी-विक्रीच्या रितसर नोंदी झाल्या तर फसरणुकीच्या घटना टळू शकतील. यासाठी प्रशासने सकारान्मक पाऊल टावले पाहिजे.-प्रशांत पवार, विश्रामबाग