शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव गटाचा चकवा यंदा कोणाला?

By admin | Updated: January 30, 2017 23:40 IST

महिला आरक्षण : वसंतदादा विकास आघाडी-राष्ट्रवादीचे काँग्रेस, भाजपसमोर तगडे आव्हान

भागवत काटकर ल्ल शेगावजत उत्तर भागातील शेगाव जिल्हा परिषद गट व कोसारी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी खुला झाला असून, शेगाव पंचायत समिती गण खुला झाला आहे. या गटात गेल्या १५ वर्षांपासून अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असून, भल्या-भल्यांना या गटाचा अंदाज चकवा देतो. यंदा वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादीच्या युतीने कॉँग्रेस व भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.शेगाव गणातील बेवनूर गाव आता कोसारीत समाविष्ट झाले आहे. कंठी गाव डफळापूर जिल्हा परिषद गटात, तर वाषाण गाव मुचंडी गटात समाविष्ट झाले आहे. मागीलवेळी कंठी, वाषाण ही दोन गावे शेगावमध्ये होती. पुनर्रचित १५ गावांच्या शेगाव गटाची निर्मिती झाली आहे.शेगाव गटात भाजपचे आ. विलासराव जगताप, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, कॉँग्रेसचे विक्रमसिंह सावंत, रासपचे जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांना मानणारे समर्थक आहेत. उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वांनीच गटवार बैठका घेतल्या आहेत. या गटावर दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते भाजपवासी झाल्याने या पक्षाने अंतिमक्षणी सुरेश शिंदे यांच्या वसंतदादा विकास आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे थेट तिरंगी सामना होणार आहे.शेगाव जिल्हा परिषद गटासाठी भाजपकडून सर्वसाधारण गटातील महिलांसाठी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांच्या पत्नी सौ. स्नेहलता जाधव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. कॉँग्रेसकडून सौ. वर्षा महादेव साळुंखे (शेगाव), सौ. वर्षाराणी दामोदर शिंदे, सौ. शुभांगी प्रतीक जाधव इच्छुक असल्या तरी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास ऊर्फ प्रकाश भोसले यांच्या पत्नी सौ. विजया भोसले यांची उमेदवारी कॉँग्रेसने निश्चित केल्याची चर्चा आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादीच्या युतीमधून सौ. संगीता पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. रासपतून किरण बोराडे यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे.शेगाव पंचायत समिती गण खुला झाला आहे. सुरुवातीला भाजपकडून शेगाव विकास संस्थेचे अध्यक्ष सचिन बोराडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र शासकीय ठेकेदाराचा परवाना असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यामुळे भाजपकडून निश्चित नाव पुढे येत नसले तरी, लक्ष्मणराव बोराडे, डॉ. सतीश भीमराव शिंदे, बलभीम हिप्परकर, अरुण खांडेकर यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. कॉँग्रेसकडून तानाजी शिवाजी शिंदे (वाळेखिंडी), महादेव साळुंखे, संकुल बोराडे, सुभाष हिप्परकर इच्छुक आहेत. वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादी युतीमधून वाळेखिंडी विकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पांडुरंग शिंदे यांची उमेदवारी निश्चित केल्याची घोषणा वाळेखिंडी येथे युतीचे नेते सुरेश शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षातून बसवंत हिरवे इच्छुक आहेत.कोसारी पंचायत समिती गण महिलेसाठी आरक्षित असून भाजपकडून प्रतापूरच्या सरपंच सुगंधा माणिक वाघमोडे, मनीषा कोंडीगिरी प्रबळ दावेदार आहेत. कॉँग्रेसकडून नाथा पाटील यांच्या पत्नी अर्चना नाथा पाटील यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सविता आलदर, विश्रांती वाघमोडे (बेवनूर) यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादी युतीतून नंदाताई बापू म्हारनूर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षातून द्वारकाबाई जगन्नाथ सरगर यांचे नाव निश्चित आहे. अपक्ष म्हणून तिप्पेहळ्ळी येथील उच्चशिक्षित अरुणा मोहनराव शिंदे याही इच्छुक आहेत.