शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

सांगलीचा खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:08 IST

 सांगली । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी ...

 सांगली । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून १२ उमेदवार नशीब अजमावत असून, त्यात भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध पक्षांचे उमेदवार, तसेच अपक्ष रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ६ वाजता मतदान पूर्ण होईल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, कोण बाजी मारणार आणि राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत उमेदवार?उमेदवाराचे नाव पक्षशंकर माने बीएसपीसंजयकाका पाटील भाजपआनंदा पाटील बळीराजा प.गोपीचंद पडळकर वं. ब. आ.डॉ. राजेंद्र कवठेकर बमुपाविशाल पाटील स्वा.शे.सं.अभिजित आवाडे-बिचुकले अपक्षअधिकराव चन्ने अपक्षदत्तात्रय पाटील अपक्षनारायण मुळीक अपक्षभक्तराज ठिगळे अपक्षहिंमत कोळी अपक्षत्रासदायक मतदारसंघभैरववाडी (ता. तासगाव), सोनसळ (कडेगाव), गार्डी (खानापूर), बावची, बागणी (वाळवा), कुंडलापूर (शिराळा), महापालिका शाळा क्र. ९, आर. बी. उर्दु, मराठी शाळा (मिरज), महापालिका शाळा क्र. २९, सांगली (सांगली) तडसर (कडेगाव), शाळा क्र. २, मार्केट यार्ड गोदाम, नगरपरिषद सामाजिक सभागृह व बालशाळा, माळी गल्ली (तासगाव), देशिंग (कवठेमहांकाळ), जिल्हा परिषद शाळा क्र. ३ (जत), कोंत्यावबोबलाद (जत) येथील एकूण २२ केंद्रे त्रासदायक प्रकारामध्ये समाविष्ट केली आहेत. तेथे प्रशासकीय स्तरावर विशेष दक्षता घेऊन त्याप्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.काही गडबड झाली तर काय?शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली, तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ व एसआरपीएफची कंपनी तेथे तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयावर कडक कारवाई करेल. मंगळवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत सांगली जिल्ह्यातील पोलीस दल सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्रासदायक मतदान केंद्राजवळ फिरती, साध्या वेशातील पथके तैनात केली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा असलेली अत्याधुनिक पोलीस वाहने ठेवली आहेत.सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदानमतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत राहता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेतअसलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतरकुणालाही मतदान करता येणार नाही.जीपीएस यंत्रणा असलेल्याट्रकने ईव्हीएम पोहोचविणारमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम सील करून ती आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणली जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका ट्रकमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सांगलीच्या विजयनगर येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविली जातील.