शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाच्या गोंधळामागे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:01 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) जिवंत रुग्णाला मृत ठरविण्यामागे नेमका कोणाचा हात? अशी चर्चा रंगू लागली आहे. मृतदेह शवागृहात नेण्यापूर्वी कर्मचाऱ्याकडून मृताच्या कपाळावर त्याच्या नावाची चिठ्ठी चिकटविली जाते; पण चिठ्ठी चिकटविणाºया कर्मचाºयाने अविनाश बागवडे यांच्या नावाची चिठ्ठी बनवून बेवारस मृतदेहाच्या कपाळावर चिकटविल्याने मृतदेह अदला-बदलीचा घोळ ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) जिवंत रुग्णाला मृत ठरविण्यामागे नेमका कोणाचा हात? अशी चर्चा रंगू लागली आहे. मृतदेह शवागृहात नेण्यापूर्वी कर्मचाऱ्याकडून मृताच्या कपाळावर त्याच्या नावाची चिठ्ठी चिकटविली जाते; पण चिठ्ठी चिकटविणाºया कर्मचाºयाने अविनाश बागवडे यांच्या नावाची चिठ्ठी बनवून बेवारस मृतदेहाच्या कपाळावर चिकटविल्याने मृतदेह अदला-बदलीचा घोळ झाला आहे.वॉर्डातील रुग्णाचा मृत्यू होण्यापूर्वीच कर्मचाºयांकडून रुग्णवाहिकाचालकांना माहिती दिली जाते. रुग्णवाहिकाचालक तातडीने रुग्णालयात येतात. तोपर्यंत रुग्ण दगावलेला असतो. मग रुग्णवाहिकाचालक मृत रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन मृतदेह नेण्याचे भाडे ठरवितात. या बदल्यात ते वॉर्डातील कर्मचाºयांना घसघशीत कमिशन देतात. गेल्या अनेक वर्षांपासून काही रुग्णवाहिका चालकांचे कर्मचाºयांशी कमिशनच्या टक्केवारीचे संबंध जोडले गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी मृतदेह अदला-बदल करण्यामागेही कर्मचाºयाची कमिशन मिळविण्याची धडपडही कारणीभूत ठरली असल्याची चर्चा आहे.‘सिव्हिल’च्या संसर्गजन्य विभागात मृतदेह अदला-बदल होण्याचा घडलेला प्रकार फारच गंभीर आहे. हा वॉर्ड ‘सिव्हिल’पासून विभक्त आहे. रुग्णांची संख्या अत्यंत कमी असते. त्यामुळे डॉक्टर फारसे या वॉर्डाकडे फिरकत नसल्याने कर्मचारी म्हणेल तोच कारभार चालतो. अविनाश बागवडे यांच्या कॉटला लागूनच बेवारस रुग्ण उपचार घेत होता. मध्यरात्री अडीच वाजता डॉक्टरांनी बेवारस रुग्णाला मृत जाहीर केले.त्यानंतर या मृतदेहाच्या कपाळावर त्याच्या नावाची चिठ्ठी चिकटविणे, उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवागृहात नेण्याची जबाबदारी कर्मचाºयांची असते. पण कर्मचाºयाने बेवारस मृतदेहाच्या कपाळावर अविनाश बागवडे यांच्या नावाची चिठ्ठी चिकटविली. त्याच्या या घोळामुळे डॉक्टर, पोलीस व बागवडे यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला.मृतदेहाच्या कपाळावर चिठ्ठी चिकटविणारा हा कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. तरीही त्याच्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली? ही चूक करण्यामागे तो शुद्धीवर नव्हता का? अशी खुद्द कर्मचाºयांमध्येच चर्चा सुरू आहे. डॉक्टरानीही पुढे तपासणी करायला हवी होती.डॉक्टर व कर्मचाºयाने दिलेल्या माहितीच्याआधारे आकस्मिक दुर्घटना विभागातील वैद्यकीय अधिकाºयांनी उत्तरीय तपासणीची व पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडली. रुग्ण डॉक्टरांनी मृत घोषित केला की, तातडीने कमिशनसाठी रुग्णवाहिक चालकाशी संपर्क साधण्याची काही कर्मचाºयांना घाईगडबड झालेली असते. या प्रकरणातही केलेली घाईगडबड रुग्णालय प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली आहे.तपासणी झाली : तरीही केसपेपरचा घोळबागवडे यांना कर्मचाºयाने मृत ठरविले; पण प्रत्यक्षात बागवडे वॉर्डात जिवंत होते. वरिष्ठांनी ते मृत झाल्याचे प्रमाणपत्र बनविले. ही सर्व कागदपत्रे रंगविण्याची प्रक्रिया सुरू असताना वॉर्डातील डॉक्टरांना व अन्य कर्मचाºयांना जराही या घोळाची कल्पना नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बागवडे मृत झाले म्हणून त्यानंतर जी पुढील प्रक्रिया राबविली गेली, त्यांचा केसपेपर हलविला, परंतु सकाळी डॉक्टरांनी वॉर्डास भेट दिल्यानंतर रुग्णांची तपासणी करतानाही हा घोळ कसा लक्षात आला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.