शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय..?

By admin | Updated: February 29, 2016 00:51 IST

इस्लामपूर पालिका : जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी

अशोक पाटील-- इस्लामपूर --गेल्या २५ वर्षांपासून इस्लामपूर पालिकेवर आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांतच नेहमीच अंतर्गत कुरघोड्या सुरूअसतात. त्यामुळे आता पालिकेच्या कामकाजात स्वत: जयंत पाटील यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामध्ये राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय? या विषयावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यांपासून पालिकेच्या पक्षबैठकीला स्वत: आमदार जयंत पाटील उपस्थित राहत आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पाची माहिती घेण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन बैठका घेतल्या. पहिली बैठक २५ मार्च रोजी ज्ञानप्रबोधिनी येथे झाली. या बैठकीस सर्वच नगरसेवकांना आमंत्रित केले होते. परंतु ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे या बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही चर्चा न होता तयार केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रती उपस्थित नगरसेवकांना देण्यात आल्या. यावेळी जयंत पाटील यांनी चर्चा करण्यासाठी २६ रोजी कारखाना कार्यस्थळावर ठराविक नगरसेवकांना आमंत्रित करून दुसऱ्या बैठकीचे नियोजन केले. या बैठकीस पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्यासह पालिकेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपावेळी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा प्रवेश झाला. त्यावेळी जयंत पाटील यांच्यासमोर पालिकेच्या राजकारणात एकदिलाने कार्यरतपणाचा दिखावूपणा करणारे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यामध्ये उपनगरांतील विकास कामांबाबत शाब्दिक चकमक झाली. यामुळे शहाजी पाटील यांनी अचानक संजय कोरे यांना टार्गेट करत, आपण राष्ट्रवादीला बदनाम करताय, असा आरोप केला. यावर संजय कोरे यांनी, आपण शहराध्यक्ष झाल्यापासून राष्ट्रवादी बदनाम होत असल्याचा प्रतिआरोप केला. यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावर जयंत पाटील यांनी मौन पाळत बैठकीतून निघून जाणे पसंत केले.याबाबत कोरे आणि पाटील यांना विचारले असता, त्यांनी याला दबकत दबकत दुजोरा दिला.पालिकेत तीन वेगवेगळे गट कार्यरतपालिकेत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांचे वेगवेगळे गट कार्यरत आहेत. अलीकडील काळात तीन भाऊ एकमेकांच्या सल्ल्याने राजकारण करत आहेत, तर एन. ए. गु्रपचे नाना जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे भूमिका बजावत आहेत. या तिघांनीही आपल्या भूतकाळात डोकावून पाहावे, म्हणजे विकास नेमका कोणाचा झाला हे समजेल, अशी चर्चा सर्वसामान्यांतून आहे.गेल्या २५ वर्षांतील पालिकेचे राजकारण पाहता, सभागृहात जवळ-जवळ तेच चेहरे आहेत. जे राजकारणातून बाहेर पडले, त्यांची अवस्था दयनीय आहे. यामध्ये काही कर्जबाजारी झाले, तर काही राजकारणातून हद्दपार झाले आहेत. पालिकेतील प्रशासनाचा अनुभव व अभ्यास असणारे ४ ते ५ नगरसेवक वजा करता, बाकी सर्व नगरसेवक केवळ हात वर करणारे आहेत.