शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

सांगलीत दादा आणि बाबांची चढाओढ नेहमीचीच. आधी कोण निवेदन देतंय, यासाठी दोघांची शर्यत! परिसरातल्या समस्या हेरायच्या अन्‌ निवेदनं, पत्रं ...

सांगलीत दादा आणि बाबांची चढाओढ नेहमीचीच. आधी कोण निवेदन देतंय, यासाठी दोघांची शर्यत! परिसरातल्या समस्या हेरायच्या अन्‌ निवेदनं, पत्रं द्यायची. मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत नुसता पत्रांचा मारा. त्यासाठी गृहपाठही करावा लागतो म्हणे. हे जाणून दादांची टीम विश्रामबागमधील त्यांच्या कार्यालयातून, तर बाबांची फौज वसंत कॉलनीतील त्यांच्या बंगल्यातून सकाळीच कामाला लागलेली असते. सोशल मीडियावर कार्यकर्ते, नागरिकांनी काही समस्या मांडली की, यांचं काम सुरू. लगेच पत्र तयार होतं. त्यात समस्या जशा असतात, तशा उपाययोजनाही सुचविलेल्या असतात हं. मग नंतर दिवसभर निवेदनांच्या कॉप्या अन्‌ ती दिल्यानंतरची छायाचित्रं सोशल मीडियावर धडाधड पडत राहतात...

‘ते’ सध्या काय करतात?

ते जिल्ह्याचे नेते. जवळजवळ सगळा जिल्हा त्यांचा मतदारसंघ. पण, सध्या कोरोनाशी सगळा जिल्हा झुंजत असताना ‘ते’ गायब आहेत. अलीकडे ते प्रसारमाध्यमांतूनही झळकलेले दिसत नाहीत. दिल्लीत तर सध्या काहीच काम नाही, मुंबईत त्यांची सत्ता नाही. मग त्यांचा शोध घ्यायचा कोठे, अशी कुजबुज मतदारांतून ऐकू येते. कुणी म्हणतात, ते बाबा-महाराजांकडे गेलेत, तर कुणी म्हणतं, कारखान्यांसाठी जुळणी करताहेत. त्यांच्या खिशात दोन साखर कारखाने आहेत. दोन्ही त्यांच्या खासगी कंपन्यांनी विकत घेतलेत. पण मागच्या हंगामातली उसाची बिलं थकलीत. त्यासाठी सगळीकडं ओरड सुरू आहे. आता लोकांसमोर आलं की, उत्तरं द्यावी लागणार... म्हणूनच ते पुढं येत नाहीत म्हणे! ‘पब्लिक’ सब जानती है!!

काम वीतभर, चमकोगिरी हातभर

इस्लामपुरातील एक वरिष्ठ अधिकारी चमकोगिरीत माहीर आहेत. हल्ली ते ‘सुप्रसिद्ध’ व्याख्यातेही बनलेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी एक ग्रुप बनवला. त्यात परिसरातल्या नामवंतांना घेतलं. त्यांच्या आधारानं मदत गोळा झाली. ती हळूहळू वाटली गेलीही. पण या अधिकाऱ्यांना प्रसिद्धीचा सोस अंमळ जास्तच. मदत आली की, काढ फोटो, कर प्रकाशित आणि मदत वाटली की, काढ फोटो, पाठव सोशल मीडियावर, हाच उद्योग. त्यातही स्वत:ची छबी झळकवण्याची हौसच जास्त. आता मात्र दानशूरांनी हात आखडता घेतलाय... कारण काय तर, ‘यांचं काम वीतभर, चमकोगिरी हातभर!’

- श्रीनिवास नागे